India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर भेदक मारा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वबाद १८८ धावाच फलकावर लावता आल्या. दरम्यान, कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला.

कारण कुलदीपच्या फिरकीवर थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू मारणाऱ्या मार्नस लॅबुशेनचा रविंद्र जडेजाने हवेत उडी मारून झेल घेतला. टी-२० वर्ल्डकपमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर जडेजाने शस्त्रक्रीया केली. पण त्यानंतर जडेजाने मैदानात कंबर कसून जबरदस्त फिटनेस केलाय. याचंच उत्तम उदाहरण आजच्या सामन्यात लबुशेनचा झेल पकड्यानंतर पाहायला मिळालं.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: तिलक वर्माचा जबरदस्त शॉट स्पायडर कॅमवर जाऊनच आदळला, पण फटका बसला हर्षल पटेलला
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Highlights Score in Marathi
IPL 2024 MI vs RCB Highlights : बुमराहचा टिच्चून मारा, इशान-सूर्याची धडाकेबाज फलंदाजी, मुंबईचा आरसीबीवर एकहाती विजय
a lady cherishes motherhood with passion
VIDEO : बाळ कडेवर घेऊन वाजवतेय ढोल ताशा! आवडीबरोबर मातृत्व जपणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल
hardik Pandya
हार्दिक पांड्याची ‘ती’ चूक अन् मुंबईने सामना गमावला; माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या कर्णधाराला झापलं

नक्की वाचा – IND vs AUS 1st ODI: नवीन विक्रमाला गवसणी घालण्याआधीच हार्दिक पांड्याने स्मिथला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श सलामीसाठी मैदानात उतरले होते. पण सिराजच्या गोलंदाजीवर हेड स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. स्मिथने सावध खेळी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पांड्याने २२ धावांवर असताना स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या. सिराज आणि जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला एक विकेट मिळाली.

मिचेल मार्शचं दमदार अर्धशतक

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ट्रेविस हेड स्वस्तात माघारी परतल्यानंतर मिचेल मार्शने दबावात न खेळता आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. कर्णधार स्टीव्ह स्मिथला हार्दिक पांड्याने २२ धावांवर तंबूत पाठवलं. ऑस्ट्रेलियाच्या २ विकेट्स गेल्यानंतरही मिचेल मार्शने चौफेर फटकेबाजी करणं सुरुच ठेवलं. मार्शने ६५ चेंडूत ८१ धावा कुटल्या. १० चौकार आणि ५ षटकार ठोवून मार्शने वानेखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मार्शला रविंद्र जडेजाच्या गुगलीने ८१ धावांवर बाद केलं.