इंडियन ऑईल कंपनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्यूनिअर इंजिनिअर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहायक अभियंता या पदासाठी एकूण साठ जागा उपलब्ध आहेत. नोकरीच्या पदासाठी कंपनीने जाहिरात काढली असून १८ ते २६ वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बीएससी झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारिख ही ५ डिसेंबर पर्यंत असणार आहे. परिक्षाप्रक्रियेद्वारे उमेदवारांची या पदासाठी निवड करण्यात येणार आहे.
पद : ज्यूनिअर इंजिनिअर असिस्टंट
पात्रता : डिल्पोमा इन इंजिनिअरिंग किंवा बीएससी
(कमीत कमी ५० % टक्के आवश्यक, आरक्षित वर्गासाठी ४५ % गुण आवश्यक )
उमेदवाराची निवड लेखी तसेच शारिरीक परिक्षेद्वारे केली जाईल
पे स्केल : ११,९०० ते ३२,००० प्रतिमहिना
अर्जासाठी पत्ता : The Chief Human Resources Manager, HR Department, Panipat Refinery & Petrochemical Complex, Panipat, Haryana-132140
अर्जाची अंतिम तारिख : ५ डिसेंबर २०१६
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2016 रोजी प्रकाशित
खुशखबर! इंडियन ऑईलमध्ये नोकरभरती
कनिष्ठ सहायक अभियंत्यांची ६० पदे रिक्त
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 17-11-2016 at 16:03 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment in indian oil corporation