Reddit Post Of Employee On Boss: कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांकडे होणाऱ्या अवास्तव मागण्या वाढत आहेत, विशेषतः जेव्हा कंपन्या चांगल्या कामाचे बक्षिसे न देता उच्च समर्पणाची अपेक्षा करतात. “मालकासारखा विचार करा” हा कॉर्पोरेटमधील वाक्यप्रयोग बहुतेकदा अधिक जबाबदारीसाठी प्रेरित करण्यासाठी वापरला जातो. परंतु जेव्हा कर्मचाऱ्याला त्याच्या चांगल्या कामासाठी मोबदला दिला जात नाही, तेव्हा ते कर्मचाऱ्यांना शोषित वाटू शकते. अलीकडील एका रेडिट पोस्टने या वादाला पुन्हा सुरुवात झाली असून, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
एका युजरने रेडिट प्लॅटफॉर्मवर कामाच्या ठिकाणी आलेल्या वैयक्तिक अनुभवाची माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये, युजरने त्याला एका वैयक्तिक बैठकीत “कर्मचाऱ्यासारखे वागणे थांबवा” आणि त्याऐवजी मालकाची मानसिकता स्वीकारण्यास सांगण्यात आल्याचे आठवण करून दिली.
सुरुवातीला युजरने असे गृहीत धरले की, असे सुचवण्यामागे पदोन्नती असेल. परंतु त्यानंतर जे काही घडले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की ते फक्त एक प्रेरणादायी भाषण होते. पगार वाढ नाही, नवीन पद नाही आणि कोणते पाठबळही नाही.
कर्मचाऱ्याने निराशा व्यक्त करत म्हटले की, त्यांना आम्ही चांगले काम करावे असे वाटते, तरीही ते आम्हाला दिल्या जाणाऱ्या पगारापेक्षा अधिक मोबदला देण्यास तयार नाहीत. युजरने यावर भर दिला की, खऱ्या मालकीमध्ये केवळ प्रोत्साहन नसते तर इक्विटी किंवा नफ्याची वाटणी समप्रमाणात मिळते.
दरम्यान, रेडिटवर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून, बॉसच्या दृष्टिकोनावर टीका करणाऱ्या इतर युजर्सकडून शेकडो प्रतिक्रिया आल्या. एकाने असे म्हटले की, कर्मचाऱ्यानेच बॉसला काढून टाकायला हवे होते.
यावेळी इतर काही युजर्सनी उपहासात्मक सल्ला दिला. एकाने कर्मचाऱ्याला “महत्त्वाच्या बैठकांसाठी” लवकर निघण्यास सुरुवात करण्याचा सल्ला दिला, ज्याचा संदर्भ मोठे अधिकारी अनेकदा बैठकीच्या नावाखाली कार्यालयातून लवकर बाहेर पडतात याच्याशी संबंधित होता. दुसऱ्या युजरने उपहासात्मकपणे कर्मचाऱ्याला पगार वाढ देताना बॉसच्या पगारात कपात करण्याची सूचना केली.