काहीही म्हणा पण आपल्यापैकी कोणाला रस्त्यावर भांडण बघायला आवडत नाही? आपल्याला कितीही घाई असली तरी आपण २ मिनिटं तरी त्यासाठी वेळ काढतो आणि काय झालं हे माहित करुन घेतो. लोकांचा मुड कसा ही असला तरी भांडण पाहिल्यानंतर मात्र तो लगेच बदलतो. कारण हे भांडण कितीही मोठं किंवा गंभीर असलं तरी आपल्याला अशी भांडणं मनोरंजक वाटतात. आपण शक्य तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मुलांना रस्त्यावर भांडताना पाहातो. पण दोन मुलांमध्ये झालेली अशी जबरदस्त फाईट यापूर्वी तुम्ही पाहिली नसेल. या व्हायरल व्हिडीओमधली दोन मुलं एकमेकांना पार जमिनीवर लोळेपर्यंत मारतात, पण थोड्या वेळाने असं नक्की काय घडतं की ते दोघे एकमेकांशी हात मिळवतात.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक पुरते गोंधळून गेले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा दुसऱ्या मुलाला जमिनीवर आपटून त्याच्या पाठीवर ठोश्या-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतोय. त्यानंतर दुसरा मुलगा सुद्धा आणखी जोर लावत पहिल्या मुलाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो. पण पहिला मुलगा स्वतःला खाली तर पाडू देत नाहीच पण त्याला आणखी लाथा बुक्क्यांनी मारताना दिसतोय. पहिला मुलगा त्याला बुक्क्यांनी लागोपाठ मारतोय, पण दुसरा मुलगा भलतंच काही करताना दिसला. त्याच्या पाठीवर बुक्क्यांचा मारा सुरू असतानाच हा मुलगा मात्र खाली जमिनीवर पडलेला त्याचा चष्मा उचलताना दिसतोय. या मुलाने जसा त्याच्या चष्मा उचलतो, पहिला मुलगा देखील मारणं बंद करतो आणि दोघेही इतरत्र पडलेल्या आपआपल्या वस्तू उचलताना दिसत आहेत.

आणखी वाचा : बिहारमध्ये अचानक रस्त्यावर पडला माशांचा पाऊस, विश्वास बसत नसेल तर हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

काही वेळापूर्वी जमिनीवर लोळेपर्यंत सुरू असलेली या दोन मुलांची फाईट अचानक संपते. इतकंच काय तर ते दोघे शेवटला एकमेकांची हात मिळवणी देखील करताना दिसून येत आहेत. दोघांमध्ये फाईट सुरू असताना अचानक असं काय झालं की त्यांनी फाईट बंद करून चक्क हात मिळवणी केली, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याचं उत्तर सापडलं नसलं तर हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

आणखी वाचा : जमिनीच्या तुकड्यासाठी जेव्हा भाजप आमदार रश्मी वर्मा आपल्याच नातेवाईकांवर तुटून पडल्या…. पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : याला म्हणतात खरी मैत्री! भूकंपाने शाळा हादरली, जीव धोक्यात घालून दिव्यांग वर्गमित्राला वाचवले, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

TansuYegen नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९४०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, “अशी लढाई मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती.” दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘हॅपी एंडिंग’. तर आणखी तिसऱ्या युजरने लिहिलं की, ‘हे प्रेमापोटी झालेलं भांडण आहे’.