पाकिस्तानमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू येईल. डिलिव्हरी बॉयला लुटायला आलेल्या चोरांचं हृदय परिवर्तन होतं आणि ते लुटलेलं सामान त्याला परत देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाकिस्तानच्या कराची शहरातली ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डिलिव्हरी बॉय बाइकवर बसण्याच्या तयारीत असतानाच मागून दुसऱ्या बाइकवर दोन व्यक्ती येतात. हे दोघं चोर डिलिव्हरी बॉयकडून पैसे, मोबाइल फोन आणि अन्य सामान चोरी करतात. चोरी झाल्यामुळे डिलिव्हरी बॉयला रडू कोसळतं. ते पाहून चोरी करायला आलेल्या चोरांना त्याची दया येते आणि ते चक्क चोरलेलं सर्व सामान त्याला परत करतात. इतकंच नाही तर जाताना त्याची गळाभेट घेऊन त्याला सांत्वना देताना हे चोर व्हिडिओमध्ये दिसत आहे.
WATCH: CCTV footage of robbers in #Karachi consoling #food delivery man and returning his valuables after he breaks down into tears goes #viral.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.For more: https://t.co/sjyrWUXJoc pic.twitter.com/GsgmurCNAw
— The Express Tribune (@etribune) June 16, 2020
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेक नेटकरी या ‘दयाळू चोरांचं’ कौतुक करत आहेत.