नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर आग्र्यातील संदीप तिवारी नावाच्या तरुणाच्या बँक खात्यामध्ये तब्बल १०० कोटी रुपये जमा झाले आहे. आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला एवढी मोठी रक्कम पाहून हा तरूण चक्रावून गेला आहे. त्यामुळे त्याच्या बँक खात्यात एवढी मोठी रक्क कोणी जमा केली याची चौकशी सुरू आहे.
वाचा : बँक व्यवस्थापकाने स्वत:च्या खिशातून अंत्यसंस्कारासाठी ग्राहकाला दिले पैसे
आग्र्याच्या सुमितनगरमध्ये राहणारा संदीप तिवारी याने काही वर्षांपूर्वी एसबीआयच्या बँक शाखेत आपले खाते उघडले होते. कॉलेजमध्ये शिकत असताना त्याने हे खाते उघडले होते. २४ नोव्हेंबरला पैसे काढण्यासाठी त्याने एटीएम गाठले. तिथे त्यांने आपल्या बँक खात्यामधली रक्कम पाहिली तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्याच्या बँक खात्यामध्ये तब्बल ९९ कोटी ९९ लाख ९१ हजार एवढी रक्कम दाखवत होते. कादाचित तांत्रिक अडचणीमुळे चुकीची रक्कम दाखवत असल्याचे त्याला वाटले. म्हणून खात्री करण्यासाठी त्यांनी शेजारच्या तीन चार एटीएममध्ये आपला बँक बॅलेन्स तपासला पण तिथेही त्याला अकाऊंमध्ये एवढीच रक्कम जमा झाल्याचे दिसत होते. त्यामुळे घाबरलेल्या संदीपने आपल्या कुटुंबियांना ही माहिती दिली. या संपूर्ण प्रकाराने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेकांनी आपल्या आपला काळा पैसा लपवण्यासाठी आपल्या नोकरांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे जमा करायला सुरूवात केली. पण मर्यादेपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणा-या ग्राहकांच्या बँक खात्यावर आयकर विभागाची करडी नजर आहे. त्यामुळे कोणीतरी आपले काळे पैसे लवण्यासाठी आपल्या बँकमध्ये पैसे टाकल्याची भिती संदीपला वाटत आहे. तेव्हा पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी पंजाबमध्ये राहणा-या टॅक्सी चालक बलविंदर सिंह यांच्या जनधन बँक खात्यात जवळपास ९, ८०६ कोटी जमा झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता यामागचे सत्य बाहेर आले होते. पैसे भरण्याच्या रकान्यात चुकून कर्मचा-यांनी बँक खात्याचा क्रमांक टाकल्याने हा घोळ झाला होता आणि या घोळामुळेच त्यांच्या बँक खात्यातमध्ये ९ हजार कोटी जमा झाल्याची माहिती बँक व्यवस्थापकाने दिली होती.