आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर, आजही चाहत्यांच्या मनात आपलं घर करुन आहे. काही दिवसांपूर्वी, सचिनने ताडोबा येथील व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. त्याच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Soaking in the pleasure of Mother Nature! Spot me in the wilderness & guess where I am Clue:Very much in Maharashtra pic.twitter.com/QuVls4Bj2r — Sachin Tendulkar (@sachin_rt) February 20, 2016 सचिनच्या या तोडाबा भेटीसंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. चिमुर तालुक्यातील कोलारा गेट परिसरातून सचिनने ताडोबामध्ये प्रवेश केला. प्रशासनाने सचिनच्या या भेटीबद्दल कितीही गुप्तता पाळली तरीही, काही पर्यटकांनी सचिनला पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र सचिनने थेट सफारीवर जाणं पसंत केल्यामुळे यावेळी चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. खासदार क्रीडा महोत्सवाकरता सचिन नागपुरला आलेला होता.