VIRAL VIDEO : सलूनमध्ये न्हाव्याने लावलेलं सलमान खानचं गाणं ऐकून ग्राहक रडू लागला

या व्हिडीओमध्ये सलूनमध्ये केस कापण्यासाठी आलेला एक ग्राहक अचानक सलमान खानचं गाणं ऐकून ढसाढसा रडू लागतो. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मनोरंजक आहे.

Saloon-Viral-Video
(Photo: Youtube/ CP Ke Jokes)

Saloon Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे आश्चर्याचा धक्का देणारे असतात, तर काही व्हिडीओ हे भावूक करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर अक्षरशः हसू आवरता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सलूनमध्ये केस कापण्यासाठी आलेला एक ग्राहक अचानक सलमान खानचं गाणं ऐकून ढसाढसा रडू लागतो. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मनोरंजक आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ग्राहक दुकानात केस कापण्यासाठी खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्याचवेळी सलूनमधला न्हावी एक गाणं लावतो. ‘हम तुम्हारे है सनम’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘कभी बंधन जुडे लिया, कभी दमन छू लिया…’ हे प्रसिद्ध गाणं वाजू लागतं. सुरुवातीला तो ग्राहक हे गाणं ऐकतो आणि नंतर काही सेकंदात ढसाढसा रडू लागतो. त्याला पाहून केस कापणारा न्हावीही खदखदून हसू लागतो आणि केस कापणं थांबवून हसायला लागतो. आजूबाजूला उभे असलेले लोकही ग्राहकाला पाहून हसायला लागतात.

आणखी वाचा : ७० वर्षीय आजींनी गंगा नदीत उडी घेत केलं गंगास्नान, VIRAL VIDEO पाहून तुम्ही हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कॅनडामध्ये आलेल्या SuperCell वादळाचा VIDEO VIRAL, थरारक दृश्य टाइमलॅप्स मोडमध्ये कॅप्चर

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ CP Ke Jokes नावाच्या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर प्रत्येकजण त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हा व्हिडीओ फॉरवर्ड करत आहे. लोक या व्हिडीओचा वापर मीम्सच्या रूपातही करत आहेत. यावर काही यूजर्स भावूकही झाले. “बिचाऱ्याला त्याचे प्रेम आठवले असेल” असं काही युजर्स म्हणत आहेत. हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हसत आहेत तर काहीजण त्याच्या वेदनाबद्दल सांत्वनही व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saloon viral video customer crying on salman khan song trending video prp

Next Story
“…म्हणून मी तेव्हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असं म्हटलं”; शहाजीबापूंचा ‘तो’ किस्सा ऐकून एकच हस्यकल्लोळ
फोटो गॅलरी