लोकसत्ता टीम

बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचविण्यासाठी ‘त्याने’ सोबत्यासह ‘पोकलॅन’ खाली आसरा घेतला, मात्र तरीही त्याचा जीव वाचलाच नाही. त्याचे दोन सोबती मात्र वाचले. अंगावर वीज पडून ‘तो’ दगावला तर दोघेजण जखमी झाले.

आणखी वाचा-प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोताळा तालुक्यातील खरबडी शिवारात ही थरारक व जीवन मृत्यूचा खेळ दर्शविणारी घटना घडली. रामराव शंकर दळवी (रामगाव) यांचेकडे ‘पोकलॅन’ वाहन आहे. त्यांचे मोताळा तालुक्यातील खरबडी शिवारातील सचिन किनगे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. बिहार मधून आलेला संजीव उमेद मंडल ( २०), चालक डोमन चुंनी उरी, व मजूर सुनील दळवी हे शुक्रवारी काम करीत असताना अचानक वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस व गारपीट सुरू झाली. यामुळे बचावासाठी हे तिघे ‘पोकलॅन’ खाली गेले. दरम्यान, विजेचा लोळ अचानक वाहनाच्या दिशेने कोसळला. यामुळे संजीव मंडल हा जागीच दगावला. त्याच्या सोबतचे दोघे मात्र बचावले असून जखमी झाले.