तुम्ही सोशल मीडियावर रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही घटनांमध्ये लोकांचा जीव वाचतो तर काही घटनांमध्ये मृत्यू होतो. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका कारचा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सीट बेल्ट संदर्भात जागृती करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाक एक भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो पाहून सीटबेल्ट का महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली आहे, कार चालकाचा गाडीवील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण आहे की, या अपघातात कारचा चकनाचूर झाला आहे. तसेच वारंवार सीटबेल्ट लावण्यासाठी सांगूनही लोक सीटबेल्ट लावत नाहीत. या कार चालकानेही सीट बेल्ट लावला नव्हता. या अपघातात कारचा चेंदामेंदा झालाच मात्र कार चालकही हवेत उडून लांबच्या लांब फेकला गेला. हा अपघात इतका भीषण होता की कार चालकाच यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – टोलनाक्याला कारची जोरदार धडक, भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; Video पाहून उडेल थरकाप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 स्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक अपघाताचे व्हिडीओ यामध्ये कैद होत असतात. असाच एका विचित्र कार अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सीट बेल्ट लावणे किती गरजेचे आहे हे, तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.