Buzz Aldrin Gets Married Fourth Time: १९६९ ला अपोलो-११ मोहिमेदरम्यान चंद्रावर चालणारा दुसरा माणूस म्हणजेच बझ ऑल्ड्रिन यांनी ९३ व्या वाढदिवसाला मैत्रीण अन्नका फौरशी लग्न केले आहे. आपल्या चौथ्या लग्नाची घोषणा करताना, अल्ड्रीन यांनी एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “माझा ९३ वा वाढदिवस तसेच मला लिव्हिंग लीजेंड्स ऑफ एव्हिएशन द्वारे सन्मानित केले गेले त्याच या आनंदाच्या दिवशी, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की माझे प्रेम डॉ. आंका फौर हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. आम्ही लॉस एंजेलिसमध्ये एका लहानशा समारंभात लग्न केले.. या लग्नानंतर एखाद्या पळून जाऊन लग्न केलेल्या तरुणांसारखा उत्साह अंगात संचारला आहे.”
तुम्हाला माहित आहे का?
बझ आल्ड्रिन हे १९६९ च्या अपोलो ११ मोहिमेत चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या तीन अमेरिकन अंतराळवीरांपैकी एक आहे. त्यांनी शनिवारी ट्विटरवर पत्नी, ६३ वर्षीय अंका फौर सह फोटो पोस्ट करून आपल्या लग्नाची घोषणा केली. ऑल्ड्रिनने यांनी यापूर्वी तीन वेळा लग्न केले आहे आणि घटस्फोट घेतला आहे. अपोलो ११ मिशनच्या तीन सदस्यांच्या क्रूमधील ते एकमेव हयात सदस्य आहे. नील आर्मस्ट्राँग हे चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे पहिले अंतराळवीर होते. १९ मिनिटांनंतर ऑल्ड्रिन त्यांच्या पाठोपाठ चंद्रावर उतरले होते. १९७१ मधून नासामधून आल्ड्रिन निवृत्त झाले. त्यांनी १९९८ मध्ये क्रूड स्पेस एक्सप्लोरेशनच्या विस्ताराला चालना देण्यासाठी Share Space Foundation ही ना-नफा संस्था स्थापन केली.




चंद्रावर दुसऱ्यांदा पाऊल ठेवलेल्या अंतराळवीराचं प्रेम
हे ही वाचा<< भाजी विक्रेते, रिक्षाचालक ते.. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडला ‘या’ VVIP पाहुण्यांना असेल हक्काचं स्थान
बझ आल्ड्रिन यांच्या पोस्टला २२,००० हून अधिक लाईक्स आणि १.८ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट करताना अनेकांनी शुभेच्छा देत आता तुम्ही चंद्रावर असल्याचं फील करत असाल अशी मजेशीर टिपण्णी केली आहे.