सध्याच्या जमान्यात प्रत्येकाला सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागले आहे. शिवाय यासाठी अनेकजण दररोज वेगवेगळे रील्स आणि स्टंट करत असतात. याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. शिवाय फेमस होण्यासाठी कधी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं याचा अंदाजदेखील आपण लावू शकतं नाही. काही लोक तर आपल्या नवजात मुलांचे फोटोदेखील इंटरनेटवर अपलोड करत असतात. पण एका महिलेला आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

अनेक लोक आपल्या मुलांच्या जन्मानंतर लगेचच त्यांचा पहिला फोटो किंवा पहिली सेल्फी पोस्ट करतात. शिवाय त्याच दिवशी इन्स्टाग्राम, फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नावाने अकाऊंट तयार करतात, पण असं करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. हो कारण न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, कतरिना स्ट्रोड नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लहानपणापासूनच आपल्या मुलांना स्टार बनवण्याचा विचार केला होता. कतरिनाला मुलगी ४ वर्षांची आणि ३ वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्य आहेत. तिने आपल्या मुलांना टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर फेमस केले होते.

हेही वाचा- कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट, फोटो Viral

या महिलेने मुलांचा जन्म झाल्यापासून त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. ज्यामध्ये ती कधी खेळताना किंवा पोहताना दिसत आहेत. मात्र, कतरिनाने २०२३ मध्ये मुलांचे फोटो व्हिडीओ पोस्ट करणं बदं केलं. कारण तिच्या लक्षात आलं की, टिकटॉकवरील एका युजरने तिच्या मुलाचा फोटो वापरून तो आपला मुलगा असल्याचा दावा केला होता.

हेही पाहा- कष्टाचं चीज झालं! डिलिव्हरी बॉयचं काम करता करता तो बनला सरकारी अधिकारी; कौतुक करण्यासाठी ‘Zomato’चं खास ट्विट, फोटो Viral

सर्व्हेमुळे समोर आली आकडेवारी –

अमेरिकेतील कॅरोलिना येथे राहणाऱ्या कतरिनाने सांगितले, “मुलांच्या फोटोचा वापर कोणी असा करु शकतं याची मला कल्पना नव्हती. एका व्यक्ताने त्याच्या फोनमध्ये मुलांचे फोटो सेव्ह केले आणि त्याने त्या फोटोंचा त्याला हवा तसा वापर केला.” आरोपीशी संबंधित माहिती कतरिनाने तिच्या नवऱ्याला सांगितली. त्यानंतर तिने मुलांची नावे आणि फोटो असलेल्या सर्व पोस्ट डिलीट केल्या. २०२१ च्या एका अमेरिकन सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ७७ टक्के पालक आपल्या मुलांचे फोटो ऑनलाइन शेअर करतात. तसेच या घटनेचा आपणाला पश्चाताप होत असल्याचं कतरिनाने सांगितलं.

हेही पाहा- सापानेच केली सापाची शिकार! चक्क कोब्राने अजगराला गिळल्याचा Video पाहून डोकंच धराल

AI धोकादायक –

शिवाय तिने एआयला धोकादायक गोष्ट म्हणून देखील वर्णन केले. मुलांच्या फोटोंशी छेडछाड करण्यासाठी एआय टूल्सचा वापर केला जातो. त्यांच्या मदतीने मुलांचे फोटो हवे तसे बनवले जातात आणि त्याचा गैरवापर केला जातो असंही कतरिना म्हणाली.