सध्या उत्तर प्रदेशमधल्या शिक्षण सेवकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. या व्हिडिओमध्ये काही शिक्षण सेवकांनी आपली नोकरी गेली तर सरळ इस्लाम धर्माचा स्वीकार करू, अशा उघड धमक्या दिल्यात. इस्लाम स्वीकारून अल्लाह हू अकबरचे नारे देऊ, अशा धमक्या देत शिक्षण सेवकांनी आपला राग व्यक्त केलाय. एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकाराने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला. यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
२६ मे १९९९ मध्ये सरकारी शाळांत ११ महिन्यांसाठी बारावी पास शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली होती. पण २५ जुलै २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक भरतीची परीक्षा देणं शिक्षण सेवकांना अनिवार्य करण्यात आले आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी त्यांना दोन संधी देण्यात येणार आहे. तेव्हा या मुद्द्यावरून एकूणच शिक्षण सेवकांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी यावरून शिक्षण सेवकांनी आंदोलनही केलं होतं. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अनेक शिक्षण सेवक आहेत जे उघडपणे सरकारला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी देत आहे. ‘गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही शाळकरी मुलांना शिकवत आहोत. तेव्हा सरकारला आमच्यामध्ये शिकवण्याची पात्रता नाही असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यावेळी आम्हाला फक्त ३ हजार रुपये पगार मिळायचा. पण तरीही आम्ही मुलांना शिकवत होतो. आता आम्हाला दरमहा ३५ हजार पगार मिळतोय तर अचानक आमच्यामध्ये योग्यता नाही असं सरकारला का वाटू लागलंय? असा सवाल त्यांनी केलाय.
एवढंच नाही तर यात काही हितसंबध जोडले असून, आमच्या जागेवर इथल्या नेतेमंडळींना स्वत:च्या नातेवाईकांना नोकरी द्यायची आहे, असेही आरोप त्यांनी केलेत. तेव्हा जर आमच्या नोकरीवर गदा आलीच तर आम्ही कुटुंबासकट इस्लाम धर्म स्वीकारून अल्लाहू अकबरचे नारे देऊ आणि जिहाद करू अशाही धमक्या त्यांनी सरकारला दिल्या आहे. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र कळू शकले नाही पण तो पाहून सोशल मीडियावर मात्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिक्षा मित्रों का नया ढोंग , नौकरी गई तो करेंगे #इस्लाम कबूल और बोलेंगे #अल्लाह_हो_अकबर#अनपढ़_गंवार_और_और_कर_भी_क्या_सकते_है pic.twitter.com/7ww0By35nW
— Rajan Shukla (@rajanshukla_) July 27, 2017