Ahamdabad Accident video: अपघाताचे बरेच व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल होत असताना बघत असतो. पण सध्या एक असा व्हिडिओ समोर आला आहे, तो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. मागच्या काही दिवसांपासून भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, असाच एक काळजात धडकी भरवणारा अपघात पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. एका क्षणात असं काय घडलं की त्यानं घर गाठण्याआधीच त्याला काळाने गाठलं हे तुम्हीच पाहा.

ही घटना गुजरातमध्ये अहमदाबादमधील भुलाभाई पार्क क्रॉस रोडवर १९ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. अहमदाबादमध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बसने धडक देत अक्षरश: चिरडलं आहे. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. काळजाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचं फुटेज आता समोर आलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक दुचाकीस्वार माणूस रस्ता ओलांडताना दिसत आहे. अचानक रस्त्याच्या पलीकडून भरधाव वेगात बस येते आणि दुचाकीस्वाराला धडक देते. धक्कादायक म्हणजे अपघातानंतरही बसचालक बस थांबवत नाही. अक्षरश: संपूर्ण बस त्या व्यक्तीच्या अंगावरुन जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यू जवळ आला पण चमत्कार झाला; दैव बलवत्तर म्हणून ‘ती’ अशी बचावली, पाहा थरारक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार बस चालकाला नोकरीवरून निलंबित करण्यात आले असून आणि त्याच्यावर IPC कलम 304A, 279, 337, 427 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 177, 134B, 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातासाठी चालकाला २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @RoadsOfMumbai नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.