Viral video: मार्क कमी दिल्यानं शिक्षक आणि विद्यार्थींमध्ये अनेक शाब्दीक वादविवाद होत असतात. परंतू सध्या अत्यंत धक्कादायक घडना समोर आली आहे. यावेळी शिक्षिकेला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. कमी मार्क दिल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला बेदम मारहाण केली. थायलंडमध्ये मध्यावधी परीक्षेत दोन गुण कमी पडल्यानंतर एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या गणिताच्या शिक्षकावर हिंसक हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याने शिक्षिकेला कानाखाली मारली, बेदम मारत लाथा मारल्याचे दिसून येते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या धक्कादायक घटनेने नेटकऱ्यांना खळबळ उडवून दिली आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी किंवा त्यांनी काही चूक केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात ही बाब सर्वसामान्य झाली आहे. यासंदर्भात काही ठिकाणी विरोध केला जात असला, तरी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हे आवश्यकच असल्याचं मानणारा देखील पालकांमधला एक गट आहे. मात्र इथे विद्यार्थ्यांनी गणिताच्या शिक्षकावर हिंसक हल्ला केलाय.
अहवालांनुसार, तिने किशोरवयीन हल्लेखोराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे. विद्यार्थ्याने शिक्षिकेला दोन गुण कमी झाल्याबद्दल विचारले आणि स्पष्टीकरण मागितले तेव्हा ही घटना घडली. त्याला २० पैकी १८ गुण मिळाले. शिक्षकाने स्पष्ट केले की, जरी त्याने योग्य उत्तरे दिली असली तरी, असाइनमेंट मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेली कार्यप्रणाली तो दाखवू शकला नाही. यावेळी विद्यार्थ्याने शिक्षिकेला पुनर्विचार करण्यास सांगितले आणि पूर्ण गुणांची मागणी केली. परंतु, शिक्षिकेने त्याची मागणी मान्य केली नाही आणि त्याची विनंती नाकारली. यानंतर नकार दिल्यावर, विद्यार्थ्याने तिच्यावर हिंसक हल्ला केला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो तिला सतत लाथा आणि ठोस्यांनी मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की विद्यार्थ्याची चौकशी केली जाईल.
पाहा व्हिडीओ
ही घटना ५ ऑगस्ट रोजी मध्य प्रांत उथाई थानी येथील एका शाळेत घडली. वृत्तानुसार, गणिताच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांमुळे विद्यार्थी असमाधानी होता. त्याच्या रागाचे रूपांतर गणिताच्या शिक्षकावर शारीरिक हल्ल्यात झाले. ही शिक्षिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर प्रसिद्ध आहे आणि ती टीचर आर्टी नावाचे पेज चालवते. तिने १० ऑगस्ट रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घटना शेअर केली.