Shocking video: प्रेमात लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. तर काही असे ही लोक असतात जे प्रेमाला खेळ समजतात. सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे. जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल.प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात. ज्याने प्रेम केलं आहे. तोच ही भावना समजू शकतो, ज्यावर आपण अतोनात प्रेम केलं, ज्या व्यक्तीसोबत भविष्याची स्वप्न रंगवली. तोच व्यक्ती आपल्याला त्रास देतो तेव्हा सगळं संपलं बस्स…आता जगायचं नाही असंच काहीस वाटतं… पण काही लोक तर गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात. ते बदला घेण्याची मानसिकता ठेवतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे.
सध्या ग्रेटर नोएडा वेस्टमधील गौर सिटी- २ मधील आम्रपाली गोल्फ होम्स सोसायटीमध्ये एक लज्जास्पद व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणाने फ्लॅटच्या बाल्कनीत आपल्या मैत्रिणीवर क्रूरपणे हल्ला केल्याचा या पाहिला मिळते.ती तरुणी आपल्या जीव वाचविण्यासाठी तिने जीवाच्या आकांताने त्याच्यासमोर हात पाय जोडताना दिसत आहे. पण तरीही तो तरुण तिच्याशी गैरवर्तन करताना दिसून आला. ही संपूर्ण घटना समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे
व्हायरल व्हिडीओची दखल घेत, बिसरख पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुण इक्बाल याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नराधम तरुणाचे वय २४ वर्ष असून तो न्यू उस्मानपूर, अरविंद नगर परिसरातील राहणार आहे. तर त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.मैत्रिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तरुणाबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ज्याच्या आधारे आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर @siddharth2596 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नेटकरी संताप व्यक्त करत आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे घटना वारंवार घडत असल्यानं आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय.