Gorilla Viral Video: आई ही शेवटी आईच असते, मग ती आपल्यासारख्या माणसांची आई असो वा प्राण्याची. आईचे हृदय तिच्या मुलांचे दुःख पाहू शकत नाही. एक आई तर दुसऱ्याच्या मुलालाही वेदनेत पाहून रडते. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना शिकागोतील ब्रुकफील्ड प्राणीसंग्रहालयातील आहे. या व्हिडिओमध्ये बेंटी जुआ नावाचा गोरिला एका ३ वर्षांच्या बेशुद्ध मुलाजवळ जाताना दिसत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांना भीती वाटू लागली की पुढे त्या मुलाचे काय होईल?

पण, गोरिलाने जे केले त्याने सर्वांचे मन जिंकून घेतलं. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, बेंटी जुआ नावाची गोरिला तिच्या १७ महिन्यांच्या बाळाला पाठीशी धरून बसली होती. तेवढ्यात प्राणीसंग्रहालयात एक तीन वर्षाचे बाळ पडले. बाळ पडताना पाहून ती त्याच्याकडे गेली. त्याला तिने आपल्या मांडीवर घेतलं आणि नंतर छातीशी धरून त्याला मिठी मारली आणि त्याच्यावर प्रेम करू लागली. यानंतर, ती बाळाला बाहेर गेटवर घेऊन गेली जिथे अधिकारी बाळाला घेण्यासाठी आले.

गोरिलाने बेशुद्ध बाळाला उचलले अन्… (Gorilla Shocking Video)

हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण गोरिलाने त्या मुलाला काळजीपूर्वक उचलले, आपल्या हातात घेतले आणि त्याला गेटवर नेले जिथे प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी वाट पाहत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @ABC News या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३ लाखांच्या वर व्ह्यूज आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “प्राण्यांमध्ये करुणा असते याचा पुरावा”, तर दुसऱ्याने “गोरिला लोकांना वाटते त्यापेक्षा खूपच हुशार असतात.” अशी कमेंट केली.