Viral video: ‘स्पर्श’ या गोष्टीत अशी ताकद आहे की, जी माणसाला सुखावते तरी किंवा आयुष्यभरासाठी नकोशा गोष्टींची आठवण करून देणारी राहते. सार्वजनिक ठिकाणी परक्या लोकांनी जबरदस्तीने केलेल्या स्पर्शांनी कित्येकींना त्यांच्या आयुष्यात दुःखाचे क्षण दिले आहेत. त्या स्पर्शाला प्रतिकार करणे म्हणजे अब्रू राखणे हा समज रूजेल तेव्हाच हे नकोसे स्पर्श थांबतील.अलीकडे या सोशल मीडियामुळे अनेक गुन्ह्यांचे खुलासे होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रक्षकच भक्षक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एक GRP पोलीस कर्मचारी अंधाराचा फायदा घेत तिला अश्लील स्पर्श करत होता. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आपण अनेकदा समाजकंटकांना आपल्या आजूबाजूला मुलींची छेड काढताना पाहिलं आहे. कधी हे समाजकंटक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना महिलांना अपशब्द वापरून त्रास देतात तर कधी त्यांचा पाठलाग करताना दिसतात. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत, ज्यामध्ये मुली धाडस दाखवत अशा लोकांना योग्य धडा शिकवताना दिसतात. मुली सार्वजनीक ठिकाणीही आता सुरक्षित नाही याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. काही विचित्र लोक गर्दीचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करतात. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये एक GRP पोलीस कर्मचारी तरुणीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही संताप होईल.
दिल्लीतून प्रयागराज या ठिकाणी जात असलेल्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. रात्री प्रवास करत असताना ही तरुणी आपल्या कोचमध्ये झोपली होती. त्यावेळी ट्रेनमध्ये तैनात असलेला GRP जवान गुपचूप तिच्याजवळ आला. ती तरुणी एकटीच प्रवास करत होती, त्यामुळे तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तो तिच्या शरीराला अश्लील स्पर्श करू लागला. पण त्यानं स्पर्श करताच तरुणीला जाग आली आणि तिनं ट्रेनमध्ये आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकताच आसपासचे लोक जागे झाले. सुदैवानं तरुणीला लगेच जाग आली आणि तिनं त्या GRP जवानाला चांगलंच खडसावलं. त्यामुळे GRP जवान घाबरला आणि तिची माफी मागू लागला.
पाहा व्हिडीओ
परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावप प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर महिला युजर्सनी आम्ही घरातून बाहेर पडायचे का नाही असा प्रश्न करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.