Emotional Video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.
परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हणतात, त्यात गरिबी वाट्याला आली की जगणं खूपच अवघड होऊन जातं. अशा वेळी गरीबीमुळे लहान मुलांना नको ते काम करण्यास भाग पाडलं जातं. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगा भर रस्त्यात धक्कादायक प्रकार करताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओ (Kid Struggle Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, भर रस्त्यात एक चिमुकला एका चाबकाने स्वत:ला मारत आहे. त्रास सहन करत सगळ्यांसमोर तो हा जीवघेणा प्रकार करतोय. व्हिडीओत काहीजण त्याला पाहून हसताना दिसतायत तर काही त्याचा व्हिडीओ काढताना दिसतायत. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून तो पोटासाठी हा धक्कादायक प्रकार करताना दिसतोय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @shubham_creator_07_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ३.४ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “माणुसकी तिथेच मरते जिथे दुसऱ्याच्या दु:खाचा लोकांना खेळ वाटतो, पण वेळ प्रत्येकाची येते फक्त थांबून पाहावं लागतं” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा पोतराज आहे लक्ष्मीआईच्या नवसाचा हा एक धर्म आहे” तर दुसऱ्याने “अरे, हसू नका रे कोणाच्या वाईट परिस्थितीवर” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “गरिबी वय बघत नाही” तर एकाने “परिस्थितीचे चटके सोसलेला आयुष्याची लढाई जिंकतोच, फक्त मनगटात बळ आणि स्वत:वर विश्वास असला पाहिजे” अशी कमेंट केली. “आयुष्याच्या वाटेवर लहान असो वा मोठा प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. परिस्थिती खूप वाईट” अशीदेखील कमेंट एकाने केली.