धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आहाराची काळजी घ्यायची असेल तर आपण घरचे जेवण खाण्यास पसंती देतो. ऑफिससाठी , कॉलेजमध्ये किंवा शाळेत जाताना आठवणीने जेवणाचा डब्बासोबत ठेवतो. पण हा डब्ब्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असेल तर? होय तुमच्या मुलांचा डब्बा अत्यंत अस्वच्छ आहे जो त्यांच्या आजारी पडण्याला कारणीभूत ठरु शकतो. हे व्हायरल होत असलेल्या एक व्हिडीओमुळे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जेवणाचा डब्बा किती अस्वच्छ असतो हे दाखवले आहे. तुमच्या मुलांना असा डब्बा देत असाल तर सावधान.

इंस्टाग्रामवर memes_ka_hutiapa नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते आहे की, जास्त वेळ जेवण करणारे प्लास्टिकचा डब्बा दिसत आहे त्यामध्ये आत स्टिलचा डब्बा असतो आणि बाहेरून प्लास्टिकचे आवरण असते. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती असा डब्बा घेतलेला दिसत आहे जो स्वच्छ धुतलेले आहे. स्क्रु ड्रायव्हरने डब्याचे प्लास्टिकचे आवरण काढून टाकतो आणि धक्कादायक दृश्य दिसते. डब्याच्या प्लास्टिकच्या आवरणाखाली अन्नाचा थर साचलेला दिसतो. व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.

cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
anil weds samasya Viral Photo
“अरे हिच्या नावातच समस्या” वधू-वराच्या नावाचा व्हायरल PHOTO पाहून युजर्सला हसू आवरेना; म्हणाले….
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा

हेही वाचा – लवंगी मिर्ची फटाका कसा तयार केला जातो; पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेट केली आहे. एकजण कमेंटमध्ये म्हणाला, “माझ्याकडे सेम डब्बा आहे.” दुसरा म्हणाला,”स्टीलचा डब्बा चांगला आहे.”

हेही वाचा – याला म्हणतात संस्कार! वडीलांना पाहून चिमुकलाही पडला आजीच्या पाया, पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ पाहून समजते की हा डब्बा किती अस्वच्छ आहे. आपण जी सफाई करतो ती फक्त वरवर होते पण आतमध्ये साचून राहिलले अन्नांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. अशा वस्तू वापरताना नीट काळजी घेतली पाहिजे. त्याच्या योग्यप्रकारे स्वच्छता वेळच्या वेळी केली पाहिजे किंवा असा डब्बा वापरणे टाळले पाहिजे.