Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ हसवणारे असतात काह रडवणारे तर काही व्हिडीओ पाहून खरोखरच धक्का बसतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जर नसता तर कुणी अशाप्रकारे किळसवाणा प्रकार करु शकतं यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

आपल्या घरात बऱ्याचदा नोकर अथवा घरकाम करणाऱ्या बायकांवर सर्व जबाबदारी सोपवून आपण निर्धास्तपणे बाहेर जातो पण सावधानता बाळगायला हवी. उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधील नागीना परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. १० वर्षे एकाच घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसवानं कृत्य समोर आलं आहे. या मोलकरीण महिलेने घरामध्ये भांडी घासताना त्यावर लघवी केल्याचा प्रकार आहे. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरकाम करणारी एक महिला भांडी धुताना त्यावर लघवी करताना दिसत आहे. यामुळेच तिच्या किळसवाण्या कृत्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकण्यात आला आहे. तसेच येथील स्वच्छतेबाबत पूर्णत: प्रश्न उपस्थित होत आहे.सदर महिला ही तेथे मागील १० वर्षापासून काम करत असल्याची माहिती आहे. यामुळेच महिलेनं केलेल्या या कृत्यामुळं विश्वासाला देखील तडा गेला आहे. स्वच्छता ही महत्वाची असल्याने या महिलेनं केलेल्या या कृत्यानं सर्वनाच धक्का बसला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरूवारी पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिला नगीना पोलिस स्टेशनमध्ये अटक केली असल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या @DNHindi एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “बापरे किती धक्कादायक प्रकार आहे हा..” तर आणखी एकानं, “आपण डोळे बंद करुन विश्वास ठेवतो पैसे देतो आणि हे अशाप्रकारे आपल्या आरोग्याशी खेळतात. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.”