शाळेच्या गेटवरच मुली आपआपसात भिडल्या, पार एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL

काहीही म्हणा पण आपल्यापैकी कोणाला रस्त्यावर भांडण बघायला आवडत नाही? आपल्याला कितीही घाई असली तरी आपण २ मिनिटं तरी त्यासाठी वेळ काढतो आणि काय झालं हे माहित करुन घेतो. असाच हा भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Girls-Fight-Video
(Photo: Twitter/ Taha_shah0 )

काहीही म्हणा पण आपल्यापैकी कोणाला रस्त्यावर भांडण बघायला आवडत नाही? आपल्याला कितीही घाई असली तरी आपण २ मिनिटं तरी त्यासाठी वेळ काढतो आणि काय झालं हे माहित करुन घेतो. लोकांचा मुड कसा ही असला तरी भांडण पाहिल्यानंतर मात्र तो लगेच बदलतो. कारण हे भांडण कितीही मोठं किंवा गंभीर असलं तरी आपल्याला अशी भांडणं मनोरंजक वाटतात. आपण शक्य तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मुलांना रस्त्यावर भांडताना पाहातो. परंतु मुलींची भांडण पाहण्यासाठी लोकांची ही गर्दी होते, कारण मुलींची भांडणं लोकांना जास्त मनोरंजक वाटतात.

मुली कुणापेक्षाही भांडणात कमी नाहीत. जेव्हा त्यांना राग येतो, तेव्हा त्या काहीही बोलायला सुरवात करतात आणि अगदी भांडण वाढलं, तर मुली एकमेकांना लाथा मारायला आणि केस खेचायला देखील कमी करत नाही. असाच मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळेच्या आवारातच अचानक मुलींची गॅंग आपआपसात भिडल्या. काही मुली हातात लाठी घेऊन एकमेकींची धु-धु धुलाई करतेय, काही मुली एकमेकींच्या झिंज्या उपटत आहेत तर काही मुली लाथा बुक्क्यांनी हाणामारी करत आहेत. शाळकरी मुलींमधली ही जबरदस्त फायटिंग तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल.

आणखी वाचा : Ratan Tata News: टाटा नॅनोमध्ये बसून VVIP ट्रिटमेंट न घेता रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलला

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी दुसऱ्या मुलीचे केस ओढतेय. त्यानंतर लाठीने तिची धुलाई करते. बाजुलाच पायऱ्यांवर सुद्धा काही मुली आपआपसात भिडलेल्या दिसून येत आहेत. आणखी दोन मुली एकमेकांना बांबूने मारताना दिसून येत आहेत. त्याचवेळी मुलींचं हे भांडण सोडवण्यासाठी एक महिला येते. पण दुसऱ्या इतर मुलीसुद्धा फायटिंगच्या मूडमध्ये येतात आणि ते पाहून भांडण सोडवण्यासाठी आलेली महिला परत निघून जाते. पुन्हा या मुली काठी घेऊन एकमेकींना मारू लागतात. त्यानंतर एक शाळकरी मुलगा या मुलींच्या लढाईत मध्यस्थी घेताना दिसून येतो आणि त्यांना थांबवू लागतो. या मुलींना तो समजावण्याचा देखील प्रयत्न करतो. भररस्त्यात मुलींची ही फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दबंग लेडी….एका हातात पिस्तुल, दुसऱ्या हातात काठी घेऊन फिरत होती, कारण ऐकून हैराण व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ बंगळूरमधला असल्याचं सांगण्यात येतंय. एक प्रसिद्ध गर्ल स्कूलच्या बाहेरचा हा व्हिडीओ असावा, असं सांगण्यात येतंय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १५०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या मुली आपआपसात का भिडल्या असतील, याचा अंदाज लावण्यास लोकांनी सुरूवात केली आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shocking video of school girls fighting on street in bengaluru viral on social media prp

Next Story
अर्ध्या रात्री बूक केली Uber Cab; किती वेळात पोहोचणार विचारताच ड्रायव्हरचं भन्नाट उत्तर, म्हणाला “पराठा…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी