Viral video: प्रत्येक घरात सासू-सुनेचे किस्से ऐकायला मिळतातच काही प्रेमाचे असतात तर काही भांडणाचे. सासू-सून ही फक्त घरापुरती मर्यादित राहिली नाही म्हणजे ती पडद्यावरही आली. टीव्ही सीरिअल, फिल्म यामध्ये सासू-सुनेचं नातं दाखवलं जातं. जे पाहायला अनेकांना आवडतं. आतापर्यंत तुम्ही सासू-सुनेचे असे ड्रामे, भांडणं पाहिले असतील.असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुनेने चक्क सासूला बेदम मारलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सासू सूनेचं भांडण हे काय नवीन नाही. पण सूनेकडून वृद्ध सासूला अशाप्रकारे मारहाण करताचा हा धक्कादायक व्हिडीओ संतापजनक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे. ज्यामध्ये एक सून तिच्या सासूला बेदम मारहाण करताना दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भरथाना भागातील असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी एक महिला आपल्या सासूला अमानुषपणे मारहाण करत आहे. अशातच तिचा लहान मुलगा मात्र आई नको मारू आजीला सोडून दे म्हणत दोघांनाही भांडणे थांबवण्याची विनंती करताना दिसत आहे.

माहितीनुसार, हा धक्कादायक व्हिडिओ समोर येण्यापूर्वी, सुनेनं तिच्या सासूविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी क्रूरता आणि निष्पाप मुलाचे ओरडणे लोकांना हादरवून टाकणारे आहे.व्हिडिओ व्हायरल होताच, सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

कायदेशीर कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीशचंद्र यांनी सांगितले की, भरठाणा पोलीस ठाण्याशी संबंधित एक व्हिडिओ प्राप्त झाला आहे, ज्याची दखल घेण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या वृद्ध सासूला मारहाण करत आहे. या संदर्भात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सुनेकडून यापूर्वी दाखल केलेल्या तक्रारीतील तथ्ये तपासली जात आहेत.इटावा पोलिसांचे म्हणणे आहे की जे काही पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक सून तिच्या वृद्ध सासूला निर्दयपणे मारहाण करत असल्याचे दिसून येते आणि एक निष्पाप मुलगा तिच्या आजीला वाचवण्यासाठी विनवणी करत आहे.