scorecardresearch

‘काळ्या जादू’द्वारे प्रेम मिळवून देतो सांगत अविवाहितांची लाखो रुपयांची फसवणूक; प्रेमासंबंधित मंत्रांचेही ठरलेले दर

पहिल्या मेणबत्तीचा अर्थ असा होता की, तिचा प्रियकर इतर कोणाशी नवीन नाते जोडू शकणार नाही.

‘काळ्या जादू’द्वारे प्रेम मिळवून देतो सांगत अविवाहितांची लाखो रुपयांची फसवणूक; प्रेमासंबंधित मंत्रांचेही ठरलेले दर
अनेक मुलांच्या रिलेशनशीपमध्ये काही कारणांमुळे दुरावा आलेला असतो. (Photo : Freepik)

अनेक मुलं मुली आपल्या प्रेयसीवर किंवा प्रियकरावर जीवापाड प्रेम करत असतात, शिवाय काही कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी एकमेकांशी ब्रेकअप केलं. तरीही ते पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्या असं एक प्रकरण उघडकीस आल आहे, ज्यामध्ये एका मुलीने आपल्या जुन्या प्रियकराला पुन्हा मिळवण्यासाठी चक्क काळ्या जादूची मदत घेतली आणि यासाठी लाखो रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील शांघाय येथील एका मुलीने आपल्या प्रियकराला पुन्हा मिळवण्यासाठी ‘काळ्या जादू’ची मदत घेतली. ज्यामुळे तिची १३,००० युआन म्हणजे जवळपास १.५६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पैशांची फसवणूक झाल्यानंतर या तरुणीला आपण बनावट ज्योतिषांच्या जाळ्यात अडकल्याचं समजल्यानंतर तिने आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू लोकांना पकडलं.

हेही पाहा- अरे यांना आवरा रे…, डान्स करतानाच काढायला लागला खुन्नस, मित्राला उचलून फेकल्याचा Video होतोय व्हायरल

अविवाहितांना करायचे टार्गेट –

आरोपी अविवाहित लोकांना टार्गेट करुन त्यांना प्रेमाशी संबंधित मंत्र आणि विधी सांगायचे, शिवाय त्यांनी अशा अविवाहित लोकांची फसवणूक करत सुमारे ९६ लाख रुपयांची कमाई केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्योतिषांच्या काळ्या जादूला बळी पडलेल्या तरुणीचे नाव माई असं आहे. टिकटॉकवरील एका कुंडलीच्या व्हिडिओद्वारे ती ज्योतिषांच्या संपर्कात गेली होती. माईने आपले भविष्य जाणून घेण्यासाठी सुरुवातीला ५९९ युआन (सुमारे 7 हजार रुपये) दिले. कारण तिला तिचा प्रियकर परत मिळू शकतो, अशी आशा ज्योतिषांनी दाखवली होती.

हेही पाहा- बापरे! हायवेवर चक्क चाके नसलेला ट्रक पळवतोय ड्रायव्हर, व्हायरल Video पाहून नेटकरी झाले हैराण

बनावट ज्योतिषांनी या तरुणीला प्रियकराला परत मिळवण्यासाठी काही विधी करावे लागतील आणि त्यासाठी पैसे लागतील असं सांगितलं. त्यांनी या तरुणीला दोन व्हिडिओ पाठवले, ज्यामध्ये दोन मेणबत्त्या जळत होत्या. पहिल्या मेणबत्तीचा अर्थ असा होता की, प्रियकर इतर कोणाशी नवीन नाते जोडू शकणार नाही. तर दुसरी मेणबत्ती म्हणजे मुलीला तिचा प्रियकर मिळेल, असा सांगण्यात आलं होतं.

नेटकरी संतापले –

हेही पाहा- Video: डोक्यावर चार गोळ्या लागूनही कुत्रीचा जीव वाचला, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

धक्कादायक बाब म्हणजे ही ‘काळी जादू’ जवळपास आठवडाभर चालणार होती. आरोपीने मुलीला सांगितलं होतं की, ते भूतांकडून काही शक्ती आणणार आहोत. त्या शक्तीमुळे तिचे नाते पूर्वीसारखे होईल. शिवाय तिचा जुना प्रियकर तिच्याशिवाय कोणाचाही विचार करणार नाही. तसंच मुलीला एक यादी दिली त्यामध्ये हजारो रुपयांच्या ताबीजचे दर लिहले होते. जेव्हा माईची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. तेव्हा लोकांनी तिला चांगलच ट्रोल केलं. एका यूजरने म्हटले की, ‘काळी जादू प्रेमाचा आजार बरा करू शकत नाही.’ आणखी एका युजरने म्हटले की, ‘मी तिच्या जुन्या बॉयफ्रेंडसाठी मी खूश आहे, कारण या काळ्या जादुचे त्याच्यावर काहीह चाललं नाही.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या