Snake Head Found in Flight : तुर्की एअरलाइंस कंपनीच्या सनएक्सप्रेसच्या एका विमानातील प्रवासादरम्यान प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणात चक्क मेलेल्या सापाचं डोकं मिळाल्यानं विमान कंपन्यांतील अन्नाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

तुर्की एअरलाइंस कंपनीच्या सनएक्सप्रेसचं एक विमान गेल्या २१ तारखेला अंकाराहून जर्मनीच्या डसेलडोर्फला निघालं होतं. या विमानातला एक क्रू मेंबर शाकाहारी होता, पण त्याला मिळालेलं जेवण हे खूपच धक्कादायक होतं. त्याला जेवणासाठी दिलेल्या बटाट्याच्या भाजीमध्ये चक्क मेलेल्या सापाचं डोकं दिसून आलं. हे पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला मोठा धक्काच बसला. विमान कंपनीने खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले. त्यांच्याकडून कोणतीही चूक झाली नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : बाप रे! घराचे वीज बिल आले तब्बल ३,४१९ कोटी रूपये, पाहून व्यक्ती हादरलाच, रूग्णालयात दाखल

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओनंतर विमान कंपनी सन एक्सप्रेसने तुर्की मीडियाला सांगितले की, हे अजिबात मान्य नाही. या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून, संबंधित अन्न पुरवठादारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीत आम्ही मागील 30 वर्षांपासून कार्यरत आहोत. त्यामुळे आमच्या विमानात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करवून देण्यावर आमचा भर असतो. आमचे पाहुणे व कर्मचारी या दोघांनाही चांगला अनुभव मिळावा असा आमचा प्रयत्न असतो, असे विमान कंपनीने म्हटले आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चीनमध्ये घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ? भितीदायक शिट्ट्यांच्या आवाजाने उडेल थरकाप!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘या’ रेसॉर्टमध्ये तुम्हाला सकाळी झोपेतून जागे करण्यासाठी रिसेप्शन कॉल नव्हे तर हत्ती येतात! पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स मात्र संतापले आहेत. अशा निष्काळजीपणाच्या कृत्यावर सोशल मीडियावरील लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, खरंच खूप चुकीचं घडलं आहे. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, कंपनीने माफी मागावी. त्याचबरोबर या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी आपली कंपनी बंद करावी, असं देखील सांगत आहेत.