सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्वच भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. दूरदूपर्यंत पसरलेले वाळूचे डोंगर, पिण्यासाठी पाणी नाही, ना विसाव्यासाठी सावली वरून आग ओकणारा सूर्य असे भयाण हे वाळवंट आहे. या वाळवंटात तीन दशकानंतर पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली आहे. हिवाळा सुरू आहे त्यामुळे अनेक खंडात यावेळी बर्फवृष्टी होते पण वाळवंटात बर्फवृष्टी होण्याचा प्रकार फार क्वचितच पाहायला मिळतो.

वाचा : गुहागरच्या समुद्रात सापडले उडणारे मासे!

डिसेंबरच्या महिन्यात सहाराच्या वाळवंटात तब्बल ३७ वर्षांनंतर बर्फवृष्टी झालेली पाहायला मिळाली. सहारा वाळवंटात दिवसाचे तापमान ४० अंशाहून अधिक असते. अशा वेळी बर्फवृष्टी होणे दुर्मिळच. पण १९ डिसेंबरला अल्जिरियाल्या Ain Sefra या वाळवंटी भागात  बर्फवृष्टी झाली. सहाराचे वाळवंट इजिप्त, लिबिया, माली, नायजर, सुदान, अल्जिरीया, टयुनिया, मोरोक्को या देशात पसरले आहे. छायचित्रकार करिम यांना हा दुर्मिळ क्षण कॅमेरामध्ये कैद करण्याचे भाग्य लाभले. या टेकडीवर बर्फाचा थर पसरला होता. फेब्रुवारी १९७९ मध्ये याठिकाणी बर्फवृष्टी झाली होती.

वाचा : ऑस्ट्रेलियामध्ये ‘ख्रिसमस ट्री’वर आढळला विषारी साप

वाळवंटात बर्फवृष्टी होण्याची ही आतापर्यंत दुसरी घटना आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला दुबईच्या अनेक वाळवंटी भागात बर्फवृष्टी झाली होती. पाहिल्यांदाच दुबईमधल्या अनेक भागात तापमान हे उणे १ अंश सेल्शिअसलच्या खाली आले होते. त्यामुळे तिथेही बर्फवृष्टी झाली होती. या अनपेक्षित वातावरण बदलाने सगळे आश्चर्यचकित झाले आहे.