शाळेत असताना ‘मार्ग शोधा’, ‘शोधा पाहू’ , ‘ओळखा पाहू’ असे खेळ विरंगुळा म्हणून आपण खेळलो असूच. पुढे, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम, कँडी क्रश यासारख्या खेळांमध्ये लहानपणीच्या आठवणी कधीच ‘क्रश’ झाल्यात. मग अचानक कधीतरी फेसबुकची वॉल चाळत असताना वेग वेगळ्या पेजच्या मार्फत अशा आठवणी समोर येतात. आपणही थोडा विरंगुळा म्हणून यातल्या कोड्यांची उत्तरे शोधतो, बालपणीच्या आठवणीत हरवून जातो. एखादी पोस्ट आवडली तर आवर्जून आपल्या मित्र मैत्रिणांना पाठतो. असेच व्हायरल झालेले हे घोड्याचे चित्र आहे. समुद्र किनारी धावत असलेल्या या घोड्याच्या चित्रांत जरी एक घोडा दिसत असला तरी सहा घोडे दडले आहे. ज्याने हे चित्र रेखाटले आहे त्याने मोठ्या शिताफिने उर्वरित पाच घोडेही या चित्रात लपवले आहेत. त्यामुळे सध्या हे घोडे शोधून दाखवण्याची स्पर्धाच जणू सुरू आहे. तेव्हा विरंगुळा म्हणून तुम्हीही प्रयत्न करू शकतात. बघू तुम्हाला जमतंय का यात लपलेले घोडे शोधायला.

untitled-3