Social Viral: या आजीचं टेबल टेनिस बघून तुम्हीही थक्क व्हाल!

हा व्हिडीओ आत्तापर्यंत ४.२ दशलक्ष लोकांनी बघितला आहे. यावर १४ हजार लोकांनी कमेंट्स करत आजीचे कौतुक केले आहे.

grandmaa playing table tennis
व्हायरल व्हिडीओ (फोटो: Sportsflu Tabletennis/ Facebook )

कोणाला खेळ आवडत नाहीत. निरोगी राहण्यासाठी तर आवर्जून खेळ खेळायलाच हवेत. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे लोकांना खेळ खेळण्यापेक्षा खेळ बघायला आवडते. पण एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये एक आजी टेबल टेनिस अतिशय उत्तम पद्धतीने खेळताना दिसते आहे. त्यांचे हे एकाहून एक अफलातून फटके पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. अतिशय शिताफीने त्या हा खेळ खेळताना दिसत आहेत, तेही साडी नेसून. खेळाडूही आपले ठराविक वय पार केले की खेळातून निवृत्त होतात. मात्र य़ा आजींचा खेळातील उत्साह पाहून त्यांच्यातील तारुण्य तुम्हाला लाजवल्याशिवाय राहणार नाही.

फक्त स्वतःसाठी हा व्हिडीओ पाहा. सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दिसणारी वृद्ध महिला ६९ वर्षांची आहे. या वयात लोक स्वतःला असहाय्य किंवा कमकुवत समजू लागतात. पण ही आजी आपल्या काळात कर्नाटकची माजी टेबल टेनिस चॅम्पियन राहिली आहे. तिचे नाव सरस्वती राव आहे. त्यांच्याकडे पाहून आपल्याला नक्कीच प्रेरित वाटते.

( हे ही वाचा: Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस! )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

सरस्वती या कशा चपळाईने टेबल टेनिस खेळत आहेत हे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यांच्या आजूबाजूला उभे असलेले लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. सोशल मीडियावर सरस्वती राव यांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. आणि हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Social viral you too will be amazed to see this grandmothers table tennis ttg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या