बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही दिवसांपासून पती आनंद आहूजासोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. यादरम्यान तिने अनेकदा रोमँटिक फोटो शेअर केले. पण नुकतेच केलेल्या एका ट्विटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या ट्विटमध्ये सोनमने आपल्यासोबत झालेली भयावह घटना शेअर केलीये. ही घटना तिच्यासोबत लंडनच्या एका कॅबमध्ये घडली. या घटनेमुळे पूर्णतः हादरुन गेलीये, असं सोनमने म्हटलंय. या घटनेचा उल्लेख करताना इतरांनीही सतर्क राहावं असं आवाहन सोनमने केलंय.
“मला लंडनच्या उबेर कॅबमध्ये सर्वात भयावह अनुभव आला. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक आणि पब्लिक कॅब हाच येथे सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. मी पूर्णतः हादरलेय. कृपया सर्वांनी सतर्क राहावं” असं ट्विट सोनम कपूरने केलं. तिच्या या ट्विटनंतर नेमकं सोनमसोबत काय घडलंय हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. तिने आपल्या ट्विटमध्ये घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली नव्हती.
Hey guys I’ve had the scariest experience with @Uber london. Please please be careful. The best and safest is just to use the local public transportation or cabs. I’m super shaken.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 15, 2020
अखेर लंडनमध्येच राहणाऱ्या एका महिलेने स्वतःसोबत काहीही वाईट घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सोनमला नेमकं काय घडलंय याबबात विचारणा केली. तिला उत्तर देताना सोनम म्हणाली, “ड्रायव्हर बहुदा मानसिकरित्या अस्थिर होता आणि माझ्यावर जोरजोरात ओरडत होता. मी त्यामुळे पूर्णतः हादरुन गेले होते”
The driver was unstable and was yelling and shouting. I was shaking by the end of it.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 15, 2020
दरम्यान,सोनमच्या ट्विटची उबेर कंपनीने दखल घेतली असून ड्रायव्हरवर लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.