Viral Video : वाहनांना घराच्या बाहेर पार्क करून ठेवल्यावर कावळ्याचे शिटणे, दुचाकीच्या सीटवर मांजरीची नखे ओरबाडलेली दिसतात. अनेक वाहनचालक या गोष्टीला कंटाळतात आणि प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपलं वाहन कपड्यानं झाकून ठेवतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला आहे. फेरारी गाडीचा एक चालक पार्किंगमध्ये येतो आणि त्याच्या गाडीवर एक कुत्रा बसलेला दिसतो; पण त्या कुत्र्याला हाकलून न देता, तो त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो.

व्हायरल व्हिडीओ गाडी पार्किंग करण्यात येते, त्या ठिकाणचा आहे. फेरारी गाडीला लाल रंगाच्या कपडयानं झाकून ठेवलेलं असतं. तसेच या खास गाडीवर रस्त्यावरचा एक कुत्रा येऊन बसलेला असतो. तितक्यात गाडीमालक बाहेर जाण्यासाठी आपली गाडी घेण्यास तिथे येतो; पण तो कुत्र्याला गाडीवर बसलेला बघूनही हाकलून न देता, त्याला कुरवाळतो आणि त्याच्यावर प्रेम करताना दिसतो. मालकानं रस्त्यावरील आपल्या गाडीवर कुत्र्याला बसलेलं पाहून काय केलं एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा

हेही वाचा…नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध चॉकलेट! Video पाहून लहानपणीचे ‘ते’ दिवस आठवतील…

व्हिडीओ नक्की बघा :

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, रस्त्यावरचे प्राणी झोपण्यासाठी दुचाकी किंवा चार चाकी वाहनांचा आसरा घेतात. या व्हिडीओतसुद्धा असंच काहीस पाहायला मिळालं आहे. गाडीवर घातलेल्या लाल रंगाच्या कापडावर कुत्रा अगदी आरामात बसला आहे. इंटेरियर डिझायनर आमीर शर्मा यानं इन्स्टाग्रामवर हा एक अद्भुत व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये रस्त्यावरचा एक कुत्रा त्याच्या झाकलेल्या फेरारी गाडीवर आरामात बसलेला दिसत आहे. तसेच गाडीमालक जवळ येताच कुत्रा आनंदाने शेपूट हलवताना दिसतो आणि मालकाचे स्वागत करतो आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @aamirsharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माझ्या फेरारी गाडीच्या कव्हरने रस्त्यावरच्या कुत्र्यासाठी उबदार पलंग बनवला’ अशी मजेशीर कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. अनेक जण व्हिडीओ पाहून गाडीचालकाचं कौतुक करीत आहेत. रस्त्यावरील प्राण्यांना आपल्या गाडीवर चढलेलं पाहून काही जण त्यांना हाकलून लावतात किंवा त्यांना इजा पोहोचवतात. पण, या युजरनं असं न करता, कुत्र्याला प्रेमानं कुरवाळलं हे पाहून अनेक जण गाडीमालकाची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसले आहेत.