सोशल मीडिया म्हंटलं की व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ. रोज या ना त्या कारणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडिया असं व्यासपीठ आहे की, रातोरात एखादी व्यक्ती स्टार बनते. त्यामुळे कोण कधी स्टार होईल सांगता येत नाही. तर काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की महिनोंमहिने त्याची चर्चा होत असते. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपटातील गाणी आणि डायलॉग व्यतिरिक्त ‘कच्चा बादाम’ गाणं ट्रेंड होत आहे. या गाण्यावर लोकं रिल्स, मीम्स तयार करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तासतास घालवणाऱ्या व्यक्तींच्या तोंडावर कच्चा बादाम हे गाणं गेल्या काही दिवसापासून आपसूक येत आहे. एखाद्याने गाणं सुरू करावं आणि दुसऱ्यानं पुढे गात जावं असं हल्ली पाहायला मिळतं.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक विद्यार्थी अभ्यास करताना या व्हिडीओत दिसत आहे, सुरुवातीला व्यवस्थितरित्या वाचणारा विद्यार्थी अचानक कच्चा बादाम गाणं गाऊ लागतो. त्यानंतर त्यालाच कळत नाही नेमकं काय झालं आहे. पुस्तकं फेकून काय होतंय अशी त्याची प्रतिक्रिया व्हिडीओत दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

यूजर्स वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच मजेशीर कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.