महाराष्ट्राचा सुमीत सदावर्ती हा ‘एशिया गॉट टॅलेन्ट’च्या जगप्रसिद्ध कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. २२ वर्षांचा सुमीत या रिअॅलिटी शोच्या उपांत्य फेरीत मजल मारलेला कदाचित पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत भारतीय रिअॅलिटी शोमध्ये अनेक विदेशी कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली होती. पण, एवढ्या मोठ्या मंचावर एखाद्या भारतीय कलाकाराला आपली कला दाखवण्याची संधी फार कमी वेळा मिळते. सुमीतला ती संधी मिळाली अन् त्यानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आपल्या आवजानं त्यानं ‘एशिया गॉट टॅलेन्ट’च्या परीक्षकांना चकित करून सोडलं. त्याच्या आवाजावर परीक्षकही खूश झालेत. परीक्षक डेव्हीड फोस्टरनंही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुमीतकडून माझ्या अपेक्षा आता खूपच वाढल्या आहेत, त्याच्या आवाजात नक्कीच काहीतरी जादू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2017 रोजी प्रकाशित
जिंकलस मित्रा! ‘एशिया गॉट टॅलेन्ट’मध्ये पोहोचलेला एकमेव भारतीय
त्याच्या आवाजावर परीक्षकही खूश झालेत
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-11-2017 at 18:03 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumit sadawarti the only indian to make it to asias got talent