Viral Video : सोशल मीडियावर अनेकदा सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालेले व्हिडीओ व्हायरल होतात. कधी अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक स्विगी इन्स्टामार्ट डिलीव्हरी बॉय चक्क शूज चोरताना दिसत आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. जर तुम्ही ऑनलाईन काही मागवत असाल तर डिलीव्हरी बॉयपासून सावध राहा. अशा प्रकारची चोरी तुमच्या घरी पण होऊ शकते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ९ एप्रिलचा असून ही घटना गुरुग्राम परिसरातील एका इमारतीत घडली आहे.

डिलीव्हरी बॉयने चोरले शूज

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला डिलीव्हरी पायऱ्या चढताना दिसतो. त्यानंतर तो एका फ्लॅटच्या दरवाज्यासमोर जातो आणि बेल वाजवतो. दरवाजा उघडेपर्यंत तो भिरभिर पाहताना दिसतो. त्यानंतर एक महिला दरवाजा उघडते. पार्सल दिल्यानंतर पायऱ्याने खाली उतरतो आणि त्याच्या डोक्यावर बांधलेला रुमाल काढतो. त्यानंतर तो फ्लॅटच्या बाहेर ठेवलेले शूज उचलतो आणि रुमालमध्ये लपवतो आणि निघून जातो. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला.

हेही वाचा : “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”

पाहा व्हायरल व्हिडीओ

Rohit Arora या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्विगीची ड्रॉप आणि पिकअप सेवा. एका डिलिव्हरी बॉयने नुकतेच माझ्या मित्राचे शूज चोरले.(@Nike)
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “लगेच तक्रार दाखल करा” तर एका युजरने लिहिलेय, “काही दिवसांपूर्वी माझ्या इमारतीमध्ये सुद्धा असेच घडले” आणखी एका युजरने लिहिलेय, “गरीबी माणसाला काहीही करण्यास भाग पाडते”