Viral Video : मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांची ऊर्जा पाहून कोणीही त्यांचा चाहता होईल. त्यांच्याबरोबर अनेक वृद्ध लोक सुद्धा व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजोबा खुल्या मैदानावर बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. ते डान्स करण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. त्यांच्या आजुबाजूला अनेक वयोवृद्ध मंडळी आहेत. हे लोक सुद्धा आजोबांवर डान्स करत त्यांना प्रोत्साहन देत आहे. आजोबा “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही त्यांचे चाहते होईल. त्यांच्या ऊर्जेसमोर तरुण मंडळी फिकी पडेल. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

kharotevijay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मस्त ओ आजोबा” तर एका युजरने लिहिलेय, “जीवनाचा आनंद कसा घ्यायचा, हे आपल्याकडून शिकण्यासारखे आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “२०२४ मध्ये सर्वात जास्त आवडलेला व्हिडीओ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी आजोबांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना आजोबांचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

हेही वाचा : VIDEO : “पंढरीचा राजा विठोबा सावळा…” तरुणाने घेतला बायकोसाठी सुंदर उखाणा, व्हिडीओ एकदा पाहाच

कोण आहेत हे आजोबा?

या आजोबांचे नाव विजय खरोटे आहे आणि हे एक व्हिडीओ क्रिएटर आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात. ते नाशिकच्या सिडको येथील रहिवासी आहे. इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते डान्सचे व्हिडीओ, रिल्स शेअर करतात.त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर युजर्सन कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव करतात.