तुम्हाला ‘शोले’ चित्रपटामधला सर्वात गाजलेला वीरूचा टाकीवरचा सीन आठवत असेलच. बसंतीशी लग्न करू दिलं नाही म्हणून गाववाल्यांना वेठीस धरण्यासाठी वीरू पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी गाववाल्यांना देतो. अर्थात बसंतीला मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. पण, तेलंगणामध्ये यापेक्षा उलटा प्रकार घडला, बायकोपासून घटस्फोट मिळावण्यासाठी इथला एक डॉक्टर चक्क शहरातल्या उंच मोबाईल टॉवरवर चढला.
Viral Video : पत्नीची समजूत काढण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्येच गायला लागला
जाणून घ्या ‘आलू डालो, सोना निकलेगा’ या राहुल गांधींच्या व्हिडिओमागचं सत्य
पत्नीने घटस्फोट दिला नाही तर मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली. अजय कुमार असं या डॉक्टरचं नाव असून सात वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याला चार वर्षांची मुलगी देखील आहे.काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती, नंतर तिने ही तक्रार मागेही घेतली. या संपूर्ण प्रकारमुळे मानसिक त्रास झालेल्या अजयने आपल्या पत्नीकडे काडीमोड मागितला. पण तिने नकार दिल्यानंतर मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली. शोलेतील दृश्याची आठवण करून देणारा हा प्रकार चार तास सुरू होता, शेवटी पोलिसांना त्याला खाली उतरवण्यात यश आलं.