जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या मुंबईच्या धारावी झोपडपट्टीला भेट देणारी इन्फ्ल्युएन्सर तारा कटिम्स मोठया वादात अडकली आहे. कारण तिच्या TikTok व्हिडिओमध्ये तिने धारावीची खिल्ली उडवली आहे. हे ऐकून संतापलेल्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. २४ वर्षीय इन्फ्ल्युएन्सरने तिच्या धारावीच्या प्रवासचा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ही माहिला एका मार्गदर्शकासह धारावीचा प्रवास करते आहे. हा मार्गदर्शक आधी धारावीमध्ये राहत होता आणि आता Airbnb द्वारे धारावी टूरसाठी मार्गदर्शन करतो.

व्हिडिओमध्ये, तारा ‘झोपडपट्टीचा टूर’ ही १०पैकी १० गुण देते आणि ती इतरांना ही येथे भेट देण्याची शिफारस करते. व्हिडीओमध्ये तारा भारतात एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना टिप्स देत आहे आणि कुकिंग क्लास आणि क्लबिंगचा आनंद घेताना दिसत आहे.

जितेंद्र नावाच्या मार्गदर्शकाच्या म्हणण्यानुसार, अंदाजे ६ युरो (अंदाजे ५४४ रुपये) खर्चाच्या या दौऱ्याचे उद्दिष्ट रूढीवादी कल्पनांना आव्हान देणे आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणे म्हणजे फार वाईट आहे हा कलंक पुसणे हा आहे.

हेही वाचा – झोपण्यासाठी फक्त ४ तास, JEE परिक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्याचे वेळापत्रक पाहून जेईईच्या उमेदवारांना धक्का बसेल

दरम्यान ‘झोपडपट्टी टूर’ या संकल्पनेला असंवेदनशील आणि “दारिद्र्य पर्यटानाचे उदाहरण म्हणून निषेध करणाऱ्या दर्शकांकडून व्हिडिओला प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी निदर्शनास आणून दिले की, अशा व्हिडीओमुळे या भागातील रहिवाशांचे मनोरंजनाच्या नावाखाली अन्याय केला जात आहे . पाश्चात्य इन्फ्ल्युएन्सरने कमी विकसित देशांमध्ये प्रवास करून आर्थिक असमानता दर्शविणारे व्हिडीओ तयार करण्यामागील नैतिकतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा- चिडलेल्या हत्तीने सोंडेने उचलली पर्यटकांची गाडी! लोकांचा आरडा-ओरडा ऐकून काळजात होईल धस्स; पाहा थरारक व्हिडीओ

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका म्हटले ,”ही मस्करी करतेय का?” तर दुसरा म्हणाला, “हिची नक्की अडचण काय आहे” तिसरा म्हणाला, होय, :आमच्या येथे सुंदर झोपडपट्ट्या आहेत” चौथा म्हणाला, “सुंदर लोक झोपडपट्टीत सापडतात.”

कटिम्सने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे या वादाला तोंड फुटले. हा वाद झोपडपट्टी पर्यटनाच्या व्यापक मुद्द्यावर आणि स्थानिक समुदायांवर त्याचा परिणाम यावर प्रकाश टाकतो. काही लोक असा युक्तिवाद करतात की, या टूर्स वंचित भागांना दृश्यमानता आणि समर्थन प्रदान करू शकतात, तर इतरांचा असा विश्वास आहे की, ते नकारात्मक स्टिरियोटाइप दर्शवतात आणि रहिवाशांना थेट लाभ देण्यात अयशस्वी ठरतात.