Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्लॉगरनी लोकांची मने जिंकली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की पाकिस्तानातील अॅचिसन कॉलेजचे माजी प्राध्यापक अमीन चोहान यांना त्यांच्या भारतातील एका मित्राने खूप छान भेटवस्तू पाठवली. जेव्हा ही खूप सुंदर भेटवस्तू अमीन चोहान पाहतात तेव्हा ते भावूक होतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
vlogumentary100′ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एखादी सामान्य वस्तू एखाद्या व्यक्तीसाठी असामान्य कशी असू शकते. जेव्हा अमीन चोहान ही भेटवस्तू पाहतात तेव्हा त्यांना अश्रु अनावर होतात. तुम्हाला वाटेल, ही भेटवस्तू कोणती आहे? तर त्यांचा मित्र भारतातील त्यांच्या वडिलांच्या घरचा दरवाजा त्यांना पाठवतो.हा दरवाजा पाहून ते खूप भावूक होतात. मुंबईतून दुबई त्यानंतर कराचीला हा दरवाजा आणण्यात आला आणि शेवटी हा दरवाजा लाहोरला चोहान यांच्या घरी पोहचवण्यात आला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा : ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, प्राध्यापक अमीन चोहान यांना भारतातून त्यांचा मित्र पलविंदर सिंगकडून जेव्हा एक खास भेटवस्तू मिळते तेव्हा ते भावूक होतात. ती भेटवस्तू कोणती आहे? बटाला येथील घोमन पिंडला अमीन चोहान यांच्या वडिलांचे घर आहे. या घराचा एक जुना दरवाजा त्यांचा मित्र त्यांना पाठवतो. असंख्य आठवणी आणि इतिहासाचा साक्षीदार असलेला हा दरवाजा सुरूवातीला मुंबई, त्यानंतर दुबई आणि शेवटी लाहोर असा लांबचा प्रवास करत अमीन चोहान यांच्या घरी येतो. अमीन चोहान जीर्ण झालेल्या दरवाज्याकडे पाहतात आणि त्यांना अश्रु अनावर होतात. १९४७ च्या फाळणीने दोन देश विभागले गेले पण पंजाबी लोकांचे हृदय कोणीच वेगळे करू शकले नाही जे वारसा आणि मैत्रीमुळे आजही एकमेकांशी जुळून आहेत.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम, हे दु:ख फक्त पंजाबी लोक समजू शकतात” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ खूप हृदयस्पर्शी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला रडू आले.”