दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषेचा तिरस्कार केल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दक्षिणेतील लोक हिंदी भाषिकांचा खरोखर द्वेष करतात का? की हा काही राजकीय अजेंडा आहे हे कळायला मार्ग नाही. पण हिंदी आणि स्थानिक भाषेवरुन वाद होतात हे मात्र नक्की. आपल्या भाषेवर प्रेम असणं काही वाईट नाही, पण समोरच्या व्यक्तीच्या भाषेचा तिरस्कार करणं नक्कीच खेदजनक आहे. भाषेबाबत बोलायचं कारणं म्हणजे, सध्या सोशल मीडियावर कर्नाटकमधील एका रिक्षा चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने रिक्षात बसलेली मुलगी कन्नड बोलली नाही म्हणून तिला रिक्षातून उतरवलं आणि तिच्याशी वादही घातला.

कर्नाटकातील रिक्षा चालकांती दादागिरी काही नवीन नाही. नुकताच एका रिक्षा चालकाने रॅपिडो बाईकस्वाराचा मोबाईल फोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आज हा नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे आता “कर्नाटकातील रिक्षा वाल्यांना आवरा” असं नेटकरी म्हणत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक रिक्षा चालक मुलीशी भांडताना दिसत आहे.

हेही वाचा- नशीबच भारी! शेतकऱ्याच्या घराचे PM आवास योजनेतून सुरु होते बांधकाम, पाया खोदताना सापडला खजिना

तरुणी कन्नडमध्ये न बोलल्यामुळे रिक्षा चालक तिच्याशी भांडत असल्याचंही व्हिडीओ पाहिल्यानंतर समजतं आहे. व्हिडिओमध्ये रिक्षा चालक ‘तुम्हाला कन्नडमध्येच बोलावेच लागेल, कारण तुम्ही कर्नाटकात आहात,’ असं म्हणाल्याचं ऐकू येत आहे. तर यावर मुलीने उत्तर दिलं की, आम्ही कर्नाटकात आहोत, मग कन्नड का बोला? आम्हाला कन्नड बोलता येत नाही. यावर ऑटो चालक रागाने म्हणतो, “ही आमची जमीन आहे, तुमची नाही, त्यामुळे तुम्हाला कन्नडमध्येच बोलावं लागेल.”

हेही वाचा- डॉक्टरांनी सांगितलेल्या वाईट बातमीमुळे बदललं जीवन; पठ्ठ्याने कमी केलं तब्बल १६५ किलो वजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना सध्या वाऱ्यासारखी सोशल मीडियावरील व्हायरल होत असून अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. मात्र, कर्नाटकातील लोक या गोष्टीचं कौतुक करत आहेत. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत की, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना स्थानिकांशी बोलण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. शिवाय अशा घटनांमुळे शहराची बदनामी होतेच, शिवाय लोकांचा त्या शहरावरील विश्वासही उडतो. तर देशाचे टेक हब असूनही बंगळुरूमधून अशी प्रकरणे वारंवार समोर येत असल्याचंही काहीजण म्हणत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी कर्नाटकबद्दलचे आपले चांगले वाईट अनुभव देखील शेअर करायला सुरुवात केली आहे. एकाने बेंगळुरूमध्ये ऑटोवाले कन्नड न बोलणाऱ्या लोकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याचंही सांगितलं आहे.