सध्या सोशल मीडियावर कार चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोलिस आणि कार मालकांनी चोरी रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करुनही कार चोरी होण्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. कार मालक आपल्या वाहनांची जेवढी काळजी घेतील त्यापेक्षा जास्त ती चोरी करण्यासाठीच्या वेगवेगळ्या आयडीया चोर शोधत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून कार चालकांच्या चिंतेत आणखी भर पडणार यात शंका नाही.

हेही पाहा-Video: विद्यार्थ्याने पेपरमध्ये उत्तराऐवजी लिहिली चक्क अली जफरची गाणी; शिक्षक म्हणाले “आंधळा…”

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

कारण, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कारचा दरवाजा कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता केवळ दोरीच्या साह्याने उघडल्याचं दिसतं आहे. कार मालक आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी खूप प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते आपल्या कारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात, विविध प्रकारचे सायरन बसवतात. तर अनेकवेळा कारच्या सुरक्षेसाठी गार्डही नेमतात. मात्र, तरीही चोरटे नवीन पद्धतीचा अवलंब करून कार पळवून नेतात.

हेही पाहा- कबुतराला वाचवण्यासाठी पोलिसाने स्वत:चा जीव घातला धोक्यात, विजेच्या टॉवरवर चढल्याचा Video होतोय व्हायरल

पण सध्या असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही थक्क होणार आहात. शिवाय जर तुम्ही कार वापरत असाल तर हा व्हिडीओ तुम्हाला को पाहायलाच हवा, जेणेकरून तुम्ही तुमच्या कारचे संरक्षण करु शकाल. नवीन पद्धतीने कारचा दरवाचा उघडण्याची आयडीया देणारा व्हिडीओ @tipsNmotivation नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कार अनलॉक करण्यासाठी अनोखी पद्धत वापरण्यात आली आहे.

दोरीच्या साह्याने उघडला दरवाचा-

व्हि़डीओमध्ये चावी नसताना कारचा दरवाचा उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता, चावी नसली तरीही लॉक सहजपणे उघडल्याचं दिसतं आहे. व्हिडीओतील व्यक्ती एका दोरीच्या साह्याने दरवाजा उघडत आहे. तो दरवाजाच्या शेजारी असलेल्या फटीतून दोरी आत ढकलतो आणि दोरीला बनवलेल्या एका गाठीचे तोंड कारचा दरवाजा लॉक करण्यासाठी जे बटण वापरलं आहे त्यामध्ये ती दोरी अडकवतो. त्यानंतर ते लॉकचे बटण दोरीच्या गाठीत आवळून वर ओढताच कारचा दरवाजा अलगद उघडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आतापर्यंत ८ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी य व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं की, हा व्हिडिओ चुकीच्या जनरेशनला दाखवण्यात आला आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने, ‘चोरांना चोरीच्या नवीन पद्धती शिकवू नका, नाहीतर त्यांना कार पळवणं सोप्प होईल’ अशी कमेंट केली आहे. तर, जुन्या गाड्यांना असे लॉक असायचे, आजकालच्या कारची लॉक वेगळी असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.