अनेकदा आपल्या कामाचे ठिकाण आपले दुसरे घर बनते. आपले सहकर्मचारी आपले कुटुंब बनतात. अशावेळी या ठिकाणाचा निरोप घेणे बहुतेकांना जड जाते. इंडिगो फ्लाइट अटेंडंटचा असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती फ्लाइटमध्ये भावनिक निरोप देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये, सुरभी नायर नावाची इंडिगो फ्लाइट अटेंडंट प्रवासी आणि इतर क्रू सदस्यांना संबोधित करताना तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करते.

व्हिडीओमध्ये, सुरभी नायर तिच्या कामाच्या शेवटच्या दिवशी भाषण देण्यासाठी विमानात पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टम वापरताना दिसत आहे. ती म्हणते, “मी कधीच विचार केला नव्हता की हाही दिवस येईल.” ती आपल्या सहकर्मचाऱ्यांचे कौतुक करत म्हणाली, “या कंपनीने मला सर्व काही दिले आहे, काम करण्यासाठी ही एक अद्भुत संस्था आहे. ही संस्था सर्वोत्तम आहे. ते प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः आम्हा मुलींची काळजी घेतात. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. मला जायचे नाही पण जावे लागेल असे वाटते.”

बुलडोजरचा रंग पिवळाच का असतो, माहित आहे का? यामागे आहे ‘हे’ रंजक कारण

यावेळी तिने प्रवाशांचेही आभार मानले. तिने म्हटले, “तुम्हा सर्वांचे आभार. आमच्याबरोबर उड्डाण करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. तुमच्यामुळेच आम्हाला आमचा पगार वेळेवर किंवा वेळेआधी मिळतो – आमच्या फ्लाइटप्रमाणेच.”

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात सुरभीच्या सहकाऱ्यांनी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आर्टिस्ट अलासेंड्रा जॉन्सनने लिहिले, ‘सुरभी, तू एक अद्भुत क्रू मेंबर होतीस, त्यापेक्षा तू एक चांगली व्यक्ती आहेस. तू खूप दयाळू आणि नम्र आहेस. तू तुझ्या सभोवतालच्या प्रत्येकाला आनंद दिला आहेस. तुझ्या चेहऱ्यावर हसू नसलेले मी कधीच पाहिले नाही. तू खूप सकारात्मक आहेस. अशीच पुढे जात राहा, शुभेच्छा. मी तुझ्यासोबत उड्डाण करायला चुकलो, पण तरीही तुझ्यासोबत खूप सुंदर आठवणी आहेत. तुझ्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.’