सध्या सोशल मीडियावर एका दूरध्वनी क्रमांकाची चर्चा रंगली आहे. हा दूरध्वनी क्रमांक म्हणजे ०८८८ ८८८ ८८८ होय. २००५ पासूनच या क्रमांकावर फोन केल्यास तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे ऐकू येते. बल्गेरियाचा हा दूरध्वनी क्रमांक कायस्वरुपी बंद करण्यात आला आहे. हा दूरध्वनी क्रमांक जो ग्राहक घेतो तो मृत्यूमुखी पडतो अशा अफवा आहेत त्यामुळे हा क्रमांक बल्गेरियामध्ये  कायस्वरुपी बंद करण्याचा निर्यण कंपनीने घेतला आहे. ‘मेल ऑनलाई’नच्या वृत्तानुसार ज्या ग्राहकांनी हा क्रमांक घेतला ते ते मरण पावले आहेत त्यामुळे भितीने हा दूरध्वनी क्रमांक देणेच कंपनीने बंद केले. मोबीटेल कंपनीच्या सिईओने हा क्रमांक घेतला होता. मात्र २००१ मध्ये त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागेही अनेक अफवा उठल्या होत्या. त्यानंतर एका ड्रग्ज माफियाने हा नंबर घेतला. पण २००३ मध्ये त्याच्या हस्तकाने त्याला मारले होते. त्याच्यावर जेव्हा गोळ्या झाडल्या तेव्हा तो फोनवर बोलत होता अशाही अफवा पसरवल्या गेल्या. २००५ मध्ये कंपनीने हा क्रमांक बल्गेरियातल्या एका व्यवसायिकाला दिला. पण त्याचवर्षी एका हॉटेलच्या बाहेर त्याचीही हत्या करण्यात आली. या तिन्ही घटनांनंतर हा क्रमांक कायमस्वरुपी बंद करण्यात आला. पण हे फोन क्रमांकाच्याच बाबतीत झाले नाही. काही परदेशी हॉटेल्समध्ये १३ क्रमांकाची खोलीही नसते. त्यामागेही काही अफवा आहेत.