वसतीगृहात दारू पिऊन येणे, उशीरा येणे, रात्री अपरात्री बाहेर जाणे, खोल्यांची स्वच्छता न राखणे, दंगा करणे असे नियम मोडल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षा झाल्याचे तुम्ही पाहिले असाल. तुमच्या अनेक मित्र मैत्रिणी ज्या वसतिगृहात राहतात त्यांनी हे नियम मोडले म्हणून शिक्षाही भोगली असले पण आता तुम्हाला आश्चर्य यासाठी वाटेल की चक्क केरळच्या एका वसतीगृहात हसले म्हणून विद्यार्थ्यांकडून ५० ५० रुपयांचा दंड आकाराला जात आहे.
वाचा : …म्हणून ‘जिया’चे सारे चिनी दिवाने
केरळमधल्या कोन्नूर जिल्ह्यातील विमल ज्योती इंजिनिअर कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. जे हसतात फक्त त्यांच्याकडून असाच दंड आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांना दंडाची पावतीही दिली जात आहे. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात बातमी दिली आहे. दिनानाथ भास्करन या फेसबुक अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर केली होती. पण नंतर दंडाच्या पावतीचे फोटो फेसबुकवर व्हायरल झाल्याने ही पोस्ट त्यांनी काढून टाकल्याचेही इंडिया टुडेने म्हटले आहे.
वाचा : दोन हजाराची साडी १६० रुपयांना
केरळची साक्षरता अधिक आहे त्यातून इंजिनिअरचे कॉलेज, पण असे असताना या पावतीवर लाफिंगची स्पेलिंगही चुकीची लिहिली होची. ‘laughing’ ऐवजी तिथे ‘laffing’ असे लिहिले होते. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली नाही तर आश्चर्य वाटायला नको.