‘तुम्ही जे काही वाईट काम करतात त्याची फळं तुम्हाला याच जन्मात भोगावी लागतात’, कर्माबद्दल चर्चा करताना हे वाक्य ऐकायला मिळतेच. आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की याची प्रचिती येईल. एका चोराने चोरी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचं नशीब एवढं वाईट की चोरी करून पळून जात असताना तो अनावधानाने थेट पोलीस स्टेशनमध्येच पोहोचला.
चीनच्या रस्त्यावरचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेची बॅग आणि हातातला फोन घेऊन एका चोराने पळ काढला, या महिलेनेही चोराचा पाठलाग केला, बिचारी पाठलाग करताना घसरून पडलीही. महिला पाठी लागल्यावर या चोराने रस्ता क्रॉस करून समोर असलेल्या इमारतीच्या दिशेने धूम ठोकली. पण आपण ज्या इमारतीच्या आवरात आलो आहोत ती चीनी पोलिसांची इमारात आहे हे मात्र या चोराच्या लक्षात आले नाही, तेव्हा या परिसरात शिरताच उभ्या असलेल्या या पोलिसांनी काही सेकंदात त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. हा चोर इथे नवखा असल्याने कदाचित त्याला शहरातले गल्ली बोळे माहिती नसावे असंच दिसतंय, या चोराचा चोरी करण्याचा प्लान पुरता फसला आणि महिलेला तिची चोरीला गेलेली बॅग परत मिळाली.