अंडी विकून कोणी लक्षाधीश झाल्याचं ऐकलंय का? नाही ना? मग तर या व्यावसायिकाला भेटाच जो अंडी विकून शे-पाचशे रुपये नाही तर चक्क वर्षाला १० लाख रुपये कमावतो. हे ऐकून तुम्हाला झटका बसला असेलच पण जेव्हा तुम्ही या व्यवसायिकाचं वय ऐकाल तेव्हा तर तुम्हाला ४४० व्होल्टचाच झटका बसेल हे नक्की. या मुलाचं वय आहे फक्त आठ वर्षे. त्याचं नाव आहे जेम्स वॅट. काही महिन्यांपूर्वी अंडी विकण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली अन् ही कल्पना त्याने आईला बोलून दाखवली. मग काय आईनेही मुलाला साथ दिली आणि जेम्सने आपल्या पिग्गी बँकेतील पैशांतून काही डझन अंडी खरेदी केली. सुरूवातीला यातून थोडा नफा जेम्सला झाला पण त्याने पुढे हा व्यवसाय वाढवायचा ठरवला.

वाचा : आईसाठी गेल्या वीस वर्षांपासून महिलेचा वेश परिधान करून ‘तो’ जगतोय

जेम्स शेतकऱ्यांकडून अंडी विकत घेतो. या अंड्यांची व्यवस्थित पॅकिंग करून तो ती अंडी आपल्या ग्राहकांना विकतो. जेवणात अंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तेव्हा अंड्यांनाही मोठी मागणी असते. दर आठवड्याला त्याचा वीस एक हजारांच्या आसपास व्यवसाय होतो, असेही ‘सीएनबीसी’ने म्हटलं आहे. जर त्याचा व्यवसाय असाच वाढत राहिला तर वर्षाकाठी तो आरामात १० लाखांच्या आसपास व्यवसाय करेल, असंही अनेकांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे जेम्स शाळा सुटल्यानंतर या व्यवसायात लक्ष घालतो. त्याची आई देखील कधी कधी त्याला या कामात मदत करते. जेम्सला मोठेपणी सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे आणि त्याने यासाठी आपले प्रयत्नही सुरू केले आहेत.

वाचा : …म्हणून ‘विनी द पू’ वर चीनमध्ये कायमची बंदी