लठ्ठपणा ही आरोग्याशी निगडीत मोठी समस्या होत चालली आहे. बदलती लाईफस्टाईल, जंक फुड, अतिताण, व्यायाम न करणे यामुळे लठ्ठपणा वाढतच जात आहे. या लठ्ठपणाचा शिकार झालेले तुम्हाला आजूबाजूला लाखो लोक दिसतील. यातले काही आपल्या लठ्ठपणाचा फार गांभीर्याने विचार करतात आणि वजन कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. तर काहीजण वजन कमी करण्यास सुरूवातही करतात पण नंतर नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसं त्यांचा प्लॅन मध्येच बारगळतो. असं तुमचंही होतंय मग तर तुम्ही या जोडप्याबद्दल जाणून घ्याच. कदाचित यांची गोष्ट वाचून तुम्हाला हेल्दी लाईफ सुरू करण्यासाठी नक्की प्रेरणा मिळेल.
लेक्सी आणि डॅनी हे दोघंही जोडपं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लेक्सीचं वर्षभरापूर्वी वजन होतं २२० किलो तर डॅनीचं वजन होतं १२७ किलो. तेव्हा या लठ्ठ जोडप्याची जो तो खिल्ली उडवायचा. त्यातून लेक्सीचं वजन तर इतकं होतं की तिला वजनामुळे चालताही यायचं नाही. हे वजन असंच वाढत गेलं तर आपलं काही खरं नाही याची जाणीव दोघांना झाली आणि दोघांनी आपलं वजन कमी करण्याचा संकल्प केला. योग्य आहार, भरपूर व्यायाम आणि जंक फूडला बाय बाय करत या दोघांनी आपलं वजन दुपटीने कमी केलं. या दोघांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. कदाचित हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हेल्दी लाईफ जगण्यासाठी नक्की प्रेरणा मिळेल.