क्रिकेटच्या मैदानात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन आपल्याला काही नवे नाहीत. मैदानात त्यांना हटके शैलीत एखादा निर्णय देताना पाहिलं की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही हसू उमटतं. त्यांच्या स्टाईलनं प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, म्हणूनच बिली सगळ्यांचे आवडते पंच आहेत असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

पण सध्या बिली बाउडनसारख्या एका पंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. हा पंच मैदानात चक्क बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या या हटके शैलीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. इतकंच नाही तर या भन्नाट पंचाचा मैदानातला डान्स पाहून भारतीय संघाचा फिरकीपटू रवींद्र जडेजाही प्रभावित झालेला दिसतो आहे. रवींद्रनं त्याचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसं क्रिकेटच्या मैदानात चौकार, षटकार मारल्यानंतर किंवा खेळाडूला झेलबाद केल्यावर मैदानात नाचून आनंद व्यक्त करताना क्रिकेटर्सना तुम्ही पाहिलं असेल. पण, पंच बिली बाउडन सोडले तर अशाप्रकारे मैदानात पंचांना नाचताना पाहण्याचा योग तसा दुर्मीळच. म्हणूनच अशा दुर्मीळ पण मजेशीर क्षणाचा हा व्हिडिओ नक्की पाहा आणि हा पंच कसा वाटला हे नक्की सांगा…

https://www.instagram.com/p/BcAIDrjFqSI/