गेल्या आठवड्यात ईस्टर संडेला श्रीलंकामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये ३०० पेक्षा आधीक जणांचा बळी गेला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये एक भारतीय वंशाचे दाम्पत्य थोडक्यात बचावले आहे. योगायोग म्हणा किंवा नशीबवान, पण श्रीलंकामधील दहशतवादी हल्ला आणि मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातूनही हे दाम्पत्य थोडक्यात बचावले आहे.

या भारतीय दाम्पत्यांचे नाव अभिनव चारी आणि नवरूप चारी असे आहे. हे दाम्पत्य व्यवसायीक दौऱ्यासाठी श्रीलंकामध्ये गेले होते. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील Cinnamon Grand hotel हॉटेलमध्ये हे दाम्पत्य थांबले होते. दहशतावाद्यांनी या हॉटेलमध्येही बॉम्बस्फोट केला होता. चारी दाम्पत्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ज्यावेली हॉटेलमध्ये ईस्टरची प्रार्थना सुरू होती. त्यावेळी आम्ही बाहेर आलो होतो. त्याचवेळी हॉटेलमध्ये जोरदार स्फोट झाला. बाहेर असल्यामुळे आमच्या दोघांचाही जीव थोडक्यात बचावला.

अभिनव चारी यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये घडलेला सर्व प्रकार कथन केला आहे. ब्लास्टनंतर हॉटेलमध्ये गेल्यावर तेथील परिस्थिती भयावह होती. बॉम्बस्फोटात सापडलेल्या लोकांचे शव अस्ताव्यस्त पडले होते.

अभिनव चारी एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. दोन्हीवेळी दुबईतून व्यावसायिक कामासाठी बाहेर गेलो आणि दोन्ही वेळा बॉम्बस्फोट झाल्याचे तो सांगतो. श्रीलंका आणि मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर तेथे दहशतवादी हल्ला झाला आहे.