आपली कला दाखवण्यासाठी प्रत्येकालाच मालिका, सिनेमा किंवा रिअॅलिटी शोसारखे मंच मिळतात असे नाही. स्टार होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मात्र, अनेकांना आपली कला दाखविण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळतेच असे नाही. अनेकजण त्यामुळे निराश होतात. मात्र, काहीजण खचून न जाता स्वत:साठी नवा मार्ग निर्माण करतात. सोशल मीडियासारखं मोठं आणि हक्काचं व्यासपीठ अनेक नवख्या कलाकारांसमोर खुलं असतं. या व्यासपीठाचा पुरेपुर वापर केला की पैसा, प्रसिद्धी सारंच मिळतं. म्हणूनच आपलं टॅलेन्ट दाखवण्यासाठी अनेक तरुण कलाकार यूट्युब, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करतात.
Viral : विमा कंपनीने मागितले फ्रंट- बॅक फोटो, तरुणीने चुकून पाठवले स्वत:चे फोटो
Viral Video : डोनाल्ड ट्रम्पच्या नातीचे मँडरिन ऐकून चीनचे राष्ट्रध्यक्षही प्रभावित झाले
सध्या एक तरूणी तिच्या अफलातून डान्स कौशल्यामुळे चर्चेत आली आहे. मुस्कान सिंह असं तिचं नाव असून आपल्या डान्स स्टाईलमुळे ती सध्या यूट्युबवरची ‘स्टार’ झाली आहे. सनी लिओनीच्या आयटम नंबर आणि आलीय भट्टच्या गाण्यावर तिने डान्स केला आहे. तिचा डान्स या दोघींपेक्षाही खूपच चांगला असल्याच्या प्रतिक्रिया तिच्या व्हिडिओवर येत आहेत. मुस्कानने जून महिन्यात यूट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडिओला ३१ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.