‘जुडवा २’ या सिनेमातील गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. जॅकलिन, वरुण आणि तापसीने आपल्या दमदार नृत्यशैलीनं ‘जुडवा’ मधली गाण्यांना नव्या रंगाढंगात समोर आणलं. या तिघांच्या दमदार नृत्यशैलीची जादू प्रेक्षकांच्या मनावरून उतरत नाही तोच या चित्रपटामधलं ‘आ तो सही’ हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Viral Video : आलिया, सनी लिओनचा डान्स तिच्यासमोर पडला फिका

डान्सर हनिशा गिआनानी या तरुणीने गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला. आठवड्याभरापूर्वी तिने युट्युबवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला साडेपाच लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. यामधील तिचे नृत्यकौशल्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडला असून अनेकांनी तिच्या प्रयत्नांचं कौतुकही केलं आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून हनिशा ही सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.