पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच जी-२० परिषदेमधून भारतात परतले. मोदींनी या परिषदेमध्ये जगभरातील अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांच्यासहीत अनेक मान्यवरांचा समावेश होता. या भेटीचे अनेक फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत असतानाच मोदींचा असाच एक फोटो खरा आहे की खोटा असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्याच एका खासदाराला पडला आहे. बरं या खासदाराने थेट ट्विटवरुन हा फोटो पोस्ट करत आपली शंका उपस्थितीत केली आहे. तसेच त्यांनी मोदींना अशापद्धतीच्या फोटोंचा मोह आवरावा असा खोचक सल्लाही दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ Video वरुन नवा वाद? ‘आता मोदी बाबांना नोटीस पाठवणार का?’ काँग्रेसचा सवाल; जाणून घ्या घडलं काय

भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी हे कायमच केंद्र सरकारविरोधात कठोर भूमिका घेताना दिसतात. अनेकदा ते केंद्रातील मोदी सरकारला वेगवेगळ्या विषयांवरुन टोले लगावत असतात. असाच एक टोला त्यांनी आता थेट पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर करत लगावला आहे. या फोटोमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान मोदींच्या खांद्यावर हात ठेऊन हसत चालत असल्याचं दिसत आहे. मात्र हा फोटो खरा आहे की मॉर्फ केलेले म्हणजेच इमेज एडिटींगच्या सहाय्याने बनवला आहे असा प्रश्न स्वामींना पडला आहे.

“हा फोटो मॉर्फ (खोटा) केलेला आहे की खरा?” असा प्रश्न स्वामींनी विचारला आहे. तसेच याच ट्विटमध्ये त्यांनी खासगी गप्पांदरम्यान अमेरिकी अधिकारी पंतप्रधान मोदी हे किती ‘फेक’ म्हणजेच नाटकी आहेत याबद्दल चर्चा करतात असा दावाही स्वामींनी केला आहे. “खासगीमध्ये अमेरिकी अधिकारी मोदी किती नाटकी वागतात याबद्दल बरेच विनोद करतात. मात्र या अशा गोष्टी ऐकणं भारतीयांसाठी फार त्रास दायक आहे,” असं स्वामींनी म्हटलं आहे. तसेच स्वामी यांनी पंतप्रधान मोदींनी अशा फोटोंचा मोह टाळावा असा सल्लाही दिला आहे. “फोटो काढण्याची अशी हौसेला पंतप्रधान मोदींनी आवर घातला पाहिजे कारण त्या बुमरँग होऊन आपल्यालाच त्रासदायक ठरतात,” असा सल्लाही स्वामींनी दिला आहे.

स्वामी यांच्या या ट्विटवर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. अनेकांनी स्वामींचा मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर मोदी समर्थकांनी या अशा फोटोंमधून मोदींचं आणि पर्यायाने भारताची जागतिक स्तरावरील स्थिती आणि महत्त्व अधोरेखित होतं असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This pm modi joe biden photo is morphed or true asks bjp mp subramanian swamy scsg
First published on: 22-11-2022 at 10:38 IST